धान गोदामातून धानाची उचल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:34+5:302021-03-18T04:28:34+5:30
मुंडीकोटा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सेवा सहकारी संस्था, मुंडीकोटा यांना धान खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले होते. सेवा ...

धान गोदामातून धानाची उचल करण्याची मागणी
मुंडीकोटा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सेवा सहकारी संस्था, मुंडीकोटा यांना धान खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले होते. सेवा सहकारी संस्था, मुंडीकोटा यांनी धान खरेदी सुरुही केली परंतु यंदा शासकीय गोदाम तसेच सेवा सहकारी संस्थेचे गोदाम धानाने पूर्ण भरलेले आहे. त्यामुळे धान खरेदी गेल्या १५ दिवसांपासून बंद करण्यात आली आहे.
या परिसरातील २८० शेतकऱ्यांचे धान अजूनपर्यंत घेणे बाकी आहे. म्हणजेच दहा हजार पोती धान शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. मार्च महिना सगळ्यांचा देवाण-घेवाण व हिशोबाचा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विविध सेवा सहकारी संस्थेत घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी लागते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या गोदामातून त्वरित धानाची उचल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.