केशोरी परिसरात रोहयोची कामे सुरु करण्याची मागणी
By Admin | Updated: November 15, 2014 22:50 IST2014-11-15T22:50:06+5:302014-11-15T22:50:06+5:30
अर्जुनी/मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात प्रामुख्याने धानपीक घेण्यात येते. धानाची तोडणी व मळणी झाल्यानंतर मजूर वर्गाना परिसरात कामे राहत नसल्यामुळे मजूर वर्ग

केशोरी परिसरात रोहयोची कामे सुरु करण्याची मागणी
केशोरी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात प्रामुख्याने धानपीक घेण्यात येते. धानाची तोडणी व मळणी झाल्यानंतर मजूर वर्गाना परिसरात कामे राहत नसल्यामुळे मजूर वर्ग इतरत्र कामासाठी भटकंती करतांना दिसतात.मागील वर्षी प्रशासकीय मंजुरी प्राप्त असलेल्या कामांना सुरूवात झाल्यास मजुरांचा, बेरोजगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल. केशोरी परिसरातील रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी मजुरांनी केली आहे.
या परिसरात नोंदणीकृत कुटुंबाची संख्या भरपूर आहे. या परिसरातील अनेक मजुरांची बँकेत खाते देखील काढण्यात आली आहेत. काही मजूरांनी पोष्टात देखील खाती उघडली आहेत. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार या भागात २१ कामांना मंजुरी मिळून प्रलंबित पडली आहेत. प्रलंबित असलेल्या या कामांना सुरुवात झाली तर या परिसरातील स्थानिक मजूराच्या हाताला काम मिळेल, तलाव, बोडी, खोलीकरण, विहीरी, वृक्ष लागवड, रस्ता रुंदीकरण इत्यादी कामांंना सुरूवात झाल्यास रोजगार हमी योजनेंतर्गत गावातील विकास कामे होण्यास मदत होईल. मात्र याकडे शासकीय कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
प्रशासनाचे ग्रामसेवक, कृषी विभाग, वन विभाग रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास अकार्यक्ष दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे. नोंदणीकृत मजुरांना त्वरीत कामे मिळण्याचे उद्देशाने या परिसरात रोजगार हमीची कामे सुरू करावी, अशी मागणी मजूर वर्गानी केली आहे. मजूरांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारांचा लोंढा शहराकडे धाव घेत आहे. (वार्ताहर)