रेशीम उद्योग व तुती लागवडीला प्रोत्साहन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:14 IST2018-01-20T22:14:44+5:302018-01-20T22:14:56+5:30
महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम उद्योग व तुती लागवडीसाठी शासन उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी समोर पण येत आहेत. मात्र गोंदिया असा एक जिल्हा आहे की या जिल्ह्यात रेशीम उद्योग व तुती लागवड नाही.

रेशीम उद्योग व तुती लागवडीला प्रोत्साहन देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम उद्योग व तुती लागवडीसाठी शासन उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी समोर पण येत आहेत. मात्र गोंदिया असा एक जिल्हा आहे की या जिल्ह्यात रेशीम उद्योग व तुती लागवड नाही. आपल्या जिल्ह्यात रेशिम उद्योग सुरु व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दवनीवाड्याचे शेतकरी अण्णा बिहारीलाल चौधरी यांनी विचार केला की आपल्या जिल्ह्यामध्ये आपणही रेशीम उद्योग व तुती लागवड करु शकतो. म्हणून त्यांनी १०-१२ गावातील शेतकºयांना सोबत घेऊन बैठक घेतली. या लागवडी आणि उद्योग बाबत समजाविले.
महाराष्ट्र शासनातर्फे मनरेगा अंतर्गत लाभ मिळतो म्हणून आपण रेशिम उद्योगाकडे का वळू नये असे विचार करुन बाकी शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम तुती लागवडीचे महत्त्व पटवून दिले. जिल्ह्यात रेशिम उद्योग सुरु व्हावा म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी त्वरीत एक बैठक घेऊन उपमुख्य कार्यकारी नरेगा नरेश भांडारकर, जिल्हा नियोजन अधिकारी भूत, वाशिम जिल्ह्याचे रेशिम सहाय्यक ज्ञानेश्वर भैरम व १५० शेतकरी बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायला निवेदन द्या असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात शेतकरी अण्णा चौधरी, विक्की बघेले, संजू बिरणवार, चौरसिया, बंटी श्रीबांसरी, लोमेश्वर पारधी, मिताराम ठाकरे, भिमशंकर पारधी, अरुण राऊत, निलेश रंगारी, प्रकाशसिंह बैस, भूमेश पटले, संजय लिल्हारे, रमेश भगत, अंगद कोल्हे, पंकज भैरम, पुरुषोत्तम राऊत, अशोक मंदरेले, दुबे, सदाशिव बिजेवार, युवराज तुरकर, योगराज तुरकर, लखनलाल डोहरे, अनिल मेश्राम, ओमकार बिसेन उपस्थित होते.