शेतसारा व गावठान अंतर्गत दुहेरी वसुली बंद करण्याची मागणी
By Admin | Updated: November 30, 2014 23:09 IST2014-11-30T23:09:01+5:302014-11-30T23:09:01+5:30
नगर भूमापन झालेल्या हदीतील शेतीव्यतिरिक्त वापराच्या जमिनीच्या मिळकतीच्या मालकी हक्काच्या फेरफार नोंदी तसेच अनुषंगिक इतर फेरफार नोंदी घेण्याची कारवाई भूमिअभिलेख विभागाकडून केली जाते.

शेतसारा व गावठान अंतर्गत दुहेरी वसुली बंद करण्याची मागणी
आमगाव : नगर भूमापन झालेल्या हदीतील शेतीव्यतिरिक्त वापराच्या जमिनीच्या मिळकतीच्या मालकी हक्काच्या फेरफार नोंदी तसेच अनुषंगिक इतर फेरफार नोंदी घेण्याची कारवाई भूमिअभिलेख विभागाकडून केली जाते. अशा जमिनीच्या मालकी हक्काची दुहेरी नोंद पद्धत बंद करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले. मात्र ग्रामपंचायत सचिव मात्र दुहेरी वसुली करीत असल्याचा प्रकार पदमपुर येथे सुरु असल्याची तक्रार श्राराम बाजीराव हुकरे यांनी केली आहे. शासन आदेशाची ग्राम सेवकाकडून अवहेलना होत असल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.
शासन परिपत्रक क्र. एस १४९७/ प्र.क्र.५१३/ल-ध दि. १४/११/१९९७ रोजी शासनाने आदेश काढले. त्यात नगर भूमापन पद्धतितील बिनशेती वापराच्या मिळकतीच्या मालकी हक्काची दुहेरी नोंद पद्धत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पदमपूर येथील श्रीराम हुकरे यांची भूमापन क्र. ३७ मध्ये जमीन व आखिव पत्रिका आहे. गट नंबर १९ चा सातबारा आहे. दोन्ही क्रमांकाची जमीन एकच आहे. सदर जागेची अकृषक आकारणी, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तलाठी सन १९९७ पासून करीत आहे. सदर जागेवर घर आहे. त्यावरील कर ग्रामपंचायत वसुल करते. तसेच पार्वतीबाई मेंढे यांची गट नंबर ३२३ ची ०.१२ आर जमिन आहे. सदर जमंीन गावठाणात असून भूमापन क्रं.१२२ ची आखिव पत्रिका आहे. या जागेची सारा वसुली तलाठी करीत नसून ग्रामपंचायत करते. अशाप्रकारच्या वसुलीने जनतेत असंतोष व्याप्त आहे. (तालुका प्रतिनिधी)