धान पिकाच्या भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST2021-03-28T04:27:42+5:302021-03-28T04:27:42+5:30

किसान सन्मान योजनेपासून वंचित गोरेगाव : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार ...

Demand for compensation for paddy crop | धान पिकाच्या भरपाईची मागणी

धान पिकाच्या भरपाईची मागणी

किसान सन्मान योजनेपासून वंचित

गोरेगाव : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेकांना लाभ मिळाला. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही योजनेचा लाभ मिळाला नाही.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता

अर्जुनी मोरगाव : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले तरी ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. आवागमनास अडथळा निर्माण होत आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे निवेदने देण्यात आली. मात्र, अद्यापही नाल्या उपसण्यात आल्या नाहीत.

बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट

गोरेगाव : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने याचा गोरगरिबांना फटका बसतो.

दुग्ध भेसळीच्या चौकशीची मागणी

सौंदड : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करून पदार्थ तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. चौकशी करण्याची मागणी आहे.

विडी उद्योगास उतरती कळा

गोंदिया : जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या विडी उद्योगास उतरती कळा लागली आहे. हे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.

अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी

गोरेगाव : कोरोनामुळे विवाह समारंभावरही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यांपासून बंद असलेली सामाजिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहेत.

शेंडा परिसरात नेटवर्कची समस्या

सडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदीटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरीत मोबाईल टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते.

दिवसाही सुरू असतात पथदिवे

गोंदिया : जिल्हास्थळ असलेल्या शहरात नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगर परिषदेवर विजेचा भुर्दंड बसत असतो. लक्ष देण्याची गरज आहे.

कचरा पेट्यांची व्यवस्था करावी

तिरोडा : येथील सहकार नगरात नगरपरिषदेच्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेला वारंवार कचरापेटीविषयी मागणी करूनदेखील व्यवस्था करण्यात आली नाही.

Web Title: Demand for compensation for paddy crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.