चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:36+5:30

या लॉँगमार्चची सुरूवात दुर्गा चौक येथून करण्यात आली. हातात चीनचा निषेध करणारी फलके व उद्घोषणा करत तिबेटीयन महिला-पुरूष तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून तेथील अर्थव्यवस्था खिळखिळी करा. चीनचे तिबेटीयनांवर अन्याय, अत्याचार सुरू असून अमानवीय कृती करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे असे विचार व्यक्त करण्यात आले.

Demand for boycott of Chinese goods | चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देतिबेटीयन बांधवांचे आवाहन : शहरात केला लॉँगमार्च

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : चीनने तिबेट बळकावला. भारताची सीमा ओलांडून घुसखोरी करण्याच्या कुरापती सुरू आहेत. भारतीय सैन्यावर हल्ला करून भारताच्या वीर जवानांना शहीद केले. चीनची मुस्कटदाबी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत प्रतापगड येथील नार्गेलिंग तिबेटीयन वसाहतीतील महिला-पुरूषांनी शुक्र वारी (दि.१०) नगरातील मुख्य मार्गाने लॉँगमार्च केला.
या लॉँगमार्चची सुरूवात दुर्गा चौक येथून करण्यात आली. हातात चीनचा निषेध करणारी फलके व उद्घोषणा करत तिबेटीयन महिला-पुरूष तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून तेथील अर्थव्यवस्था खिळखिळी करा. चीनचे तिबेटीयनांवर अन्याय, अत्याचार सुरू असून अमानवीय कृती करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे असे विचार व्यक्त करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा लॉँगमार्च काढण्यात आला.
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना २ मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. तिबेट व भारताचे राष्ट्रगीत प्रस्तुत करण्यात आले.
तिबेटीयनांच्या या भावना भारत सरकारला पाठविण्याचे आवाहन तिबेटीयन युथ काँग्रेसचे अध्यक्ष लामा लोंबसंग तेंनपा, कुनसंग डेचेन, तेंझनी पासंग यांनी केले.

Web Title: Demand for boycott of Chinese goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन