शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

गंगाबाईत प्रसूती करणे झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 6:00 AM

या विभागात आधीच कमी म्हणजे फक्त आठ डॉक्टर होते. त्यापैकी सहा डॉक्टरांचा बाँड संपूनही त्यांना पुन्हा नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले नाही किंवा ते यायला तयार नाही. तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रसूती विभागात डॉ.राजश्री पाटील व डॉ.गरीमा बग्गा ह्या दोनच डॉक्टर दिवसभरापासून काम करीत होत्या.

ठळक मुद्दे२० गर्भवतींना घरी पाठविले : २० डॉक्टरांची धुरा केवळ दोन डॉक्टरांवर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गर्भवतींची काळजी घेणारे गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय आजघडीला रूग्णांना सेवा देण्यास नाकारत आहे. आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गंगाबाई रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. परिणामी शुक्रवारी (दि.१) २० गर्भवतींना प्रसूती करण्यास नकार देऊन घरी परत पाठविण्यात आले.वर्षाकाठी ८ हजाराच्या घरात प्रसूती होणाऱ्या बाई गंगाबाईत आज एकही प्रसूती करू शकणार नाही असा पवित्रा शुक्रवारी येथील प्रसूती तज्ज्ञांनी घेतला आहे. आठ-आठ तासाच्या तीन शिप्टनुसार कमीत कमी २० डॉक्टर प्रसूती विभागात असायला हवे. परंतु या विभागात आधीच कमी म्हणजे फक्त आठ डॉक्टर होते. त्यापैकी सहा डॉक्टरांचा बाँड संपूनही त्यांना पुन्हा नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले नाही किंवा ते यायला तयार नाही. तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रसूती विभागात डॉ.राजश्री पाटील व डॉ.गरीमा बग्गा ह्या दोनच डॉक्टर दिवसभरापासून काम करीत होत्या.आठ ते दहा तास काम केल्यानंतर पुन्हा काम करणे शक्य होणार नाही म्हणून त्यांनी गर्भवतींची प्रसूती करण्यास नकार दिला. २० डॉक्टरांचे काम दोनच डॉक्टर कसे करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाºया तीन गर्भवती महिलांना १०८ रूग्णवाहिकेने गंगाबाईत आणण्यात आले. यावेळी दुपारी १ वाजताच्या सुमारास खमारी येथील एक गर्भवती प्रसूतीसाठी आली. परंतु ह्या चारही गर्भवतींना दाखल न करता घरी किंवा इतर आरोग्य संस्थेत जाण्यास सांगितले. यापूर्वी १६ गर्भवतींना परत पाठविण्यात आले होते.खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या त्या गर्भवतींना दाखल करावे,यासाठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते गंगाधर परशुरामकर यांनी तब्बल तीन तास गंगाबाईत उपस्थित राहून वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. व्ही. पी.रूखमोडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.भूषणकुमार रामटेके , गंगाबाईच्या अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्याशी चर्चा करून रूग्णांना गंगाबाईत दाखल करण्यास भाग पाडले.परंतु दाखल झालेल्या त्या गर्भवतींची देखरेख कोण करणार असा सवाल येथील उपस्थित डॉ. राजश्री पाटील यांनी उपस्थित केला. परशुरामकर यांच्या दबावापोटी तीन रूग्णांना दाखल करण्यात आले. तर एका गर्भवतीला उपचारासाठी भंडाराच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रवाना करण्यात आले.गंगाबाईत स्त्री रोग तज्ज्ञ नसल्यामुळे गंगाबाईत आजपासून पुन्हा प्रसूती बंद करण्यात आल्या आहेत. २० डॉक्टरांच्या कामाचा भार दोन डॉक्टरांवरच आहे.दीड महिन्यापासून प्रमुखाचे कक्षाला कुलूप४गंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रसूती कक्षाचे प्रमुख डॉ. देशमुख आहेत. परंतु मागील दीड महिन्यापासून ते सुट्टीवर असल्याने त्यांनी कक्षाला कुलूप लावून ठेवले आहे. त्यांचा प्रभार डॉ. राजश्री पाटील यांच्याकडे देण्यात आला परंतु कक्षाला कुलूप असल्यामुळे त्यांना पत्रव्यवहार करतांना हाताने पत्र लिहावे लागत आहे. महिनाभरापासून डॉक्टरांची मागणी करूनही वैद्यकीय अधिष्ठाता यांनी डॉक्टर उपलब्ध करून दिले नाही, अशी खंत व्यक्त केली.तीन महिन्यांपासून पाठपुरावा४गंगाबाईत ही परिस्थिती येणार यासाठी गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी मागील तीन महिन्यापासून जिल्हा शल्यचिकीत्सक व वैद्यकीय अधिष्ठाता यांना पत्र लिहीले. काही डॉक्टरांचे करार संपणार होते. काहींनी महिनाभरापूर्वी राजीनामा लिहून दिला होता.परंतु याकडे वैद्यकीय अधिष्ठाता यांनी सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे आज घडीला गंगाबाईत प्रसूती होणे बंद झाले आहे.परशुरामकर टाकणार जनहित याचिका४गंगाबाईत गोरगरिबांचा उपचार होत नाही. ग्रामीण भागातील गर्भवतींना रेफर टू, नागपूर, भंडारा केले जात असल्याने ह्या संदर्भात जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात लवकरच जनहित याचिका टाकणार असल्याचे सांगितले. गोंदियातील संपूर्ण आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याची तक्रार केली जाणार आहे.उद्भवू शकतो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न४गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे आंतर रूग्ण व बाह्य रूग्ण तपासणी होत नाही. त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो. त्यासाठी त्वरीत प्रसूती तज्ज्ञ उपलब्ध करून द्यावे, असे डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी वैद्यकीय अधिष्ठाता यांना १ नोव्हेंबर रोजी पत्र लिहीले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल