अनुदानावर कृषी अवजारांचे वितरण
By Admin | Updated: October 11, 2015 01:02 IST2015-10-11T01:02:11+5:302015-10-11T01:02:11+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये वितरीत करावयाच्या कृषी अवजारांसाठीचे अनुदान भेट लाभार्थ्यांचा खात्यावर ...

अनुदानावर कृषी अवजारांचे वितरण
गोठणगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये वितरीत करावयाच्या कृषी अवजारांसाठीचे अनुदान भेट लाभार्थ्यांचा खात्यावर जमा करण्यासाठी अर्जाची मागणी तालुका कृषी अधिकारी अर्जुनी-मोरगाव यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या ९ जुलै २०१५ नुसार तसेच शासन निर्णय क्र. राकृवि ०२१५/५ क्र.१५/राकृवियो कक्ष ०१ आॅगस्ट २०१५ नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१५-१६ अंतर्गत औजारे घटकासाठी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्याकरिता लाभार्थ्याने कृषी मित्राकडून रितसर फार्म भरुन कृषी सहायकाच्या मदतीने तालुका कृषी अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. लाभार्थ्याला बाजारातून कृषी अवजारे विकत घ्यायचे आहे. परंतु त्यावर आयएसआय मार्क असणे गरजेचे आहे. त्यानंतर घेतलेले बिल व अर्ज भरुन द्यायचे आहे. कृषी विभाग थेट लाभार्थ्याच्या बैंक खात्यावर पन्नास टक्के रक्कम जमा करेल. (वार्ताहर)
अनुदानावर कृषी अवजारे वितरण
कृषी अवजारे अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना ५० टक्के वर देण्यात येणारे आहे. कृषी अवजारे पॉवरट्रिलर आठ एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमता, रोटावेटर, स्वयंचलित धान लागवड यंत्र, ड्रम सीडर, मनुष्यचलित फवारणी पंप, पॉवर नॅपरॉक फवारनी पंप, स्वयंचलित धान कापणी यंत्र, स्वयंचलित धान कापणी व बांधणी यंत्र, धान मळणी यंत्र, पंपसंच, युरिया ब्रिकेट मशीन थेट बाजारातून खरेदी करून खरेदी बिल अर्जासोबत जोडून द्यावे, असे कृषी सहायक काळे यांनी आवाहन केले आहे.