कोलकात्याच्या दिव्यांनी घातली भुरळ
By Admin | Updated: November 3, 2015 02:26 IST2015-11-03T02:26:19+5:302015-11-03T02:26:19+5:30
दिवाळीच्या सणात दिव्यांचे महत्व असल्याने घरात नवीन दिव्यांची खरेदी करून त्यांनाच प्रज्वलीत केले जाते. दिवाळीत दिव्यांचा

कोलकात्याच्या दिव्यांनी घातली भुरळ
कपिल केकत ल्ल गोंदिया
दिवाळीच्या सणात दिव्यांचे महत्व असल्याने घरात नवीन दिव्यांची खरेदी करून त्यांनाच प्रज्वलीत केले जाते. दिवाळीत दिव्यांचा मान बघता आता दिव्यांच्या एकाहून एक व्हेरायटी बाजारात बघावयास मिळत आहेत. यात कोलकात्याच्या दिव्यांनी सध्या गोदियाकरांना चांगलीच भुरळ घातली आहे. विविध आकार, प्रकार व रंगांच्या या दिव्यांना गोंदियाकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभत असून त्यांची खरेदी केली जात आहे.
सुख व समृद्धीचा सण म्हणजे दिवाळी असून महालक्ष्मीच्या आगमनासाठी सर्वत्र प्रकाश करण्याची परंपरा आहे. म्हणूनच प्रकाशाचा हा सण म्हटला जात असून या सणात दिव्यांना मान आहे. घराघरांत नवीन दिवे जाळून प्रकाश करून महालक्ष्मीचे स्वागत केले जाते. याकरिता प्रत्येक जण नवीन दिवे खरेदी करतात. याकरिता कुंभारासाठीही दिवाळीचा हा सण चांगलाच फायद्याचा असतो. त्यामुळे कुंभार मोठ्या संख्येत दिवे तयार करून त्यांची विक्री करतात.
मात्र आजच्या या युगात नागरिकांकडून प्रत्येक वस्तूसाठी नवीन व्हेरायटीची मागणी केली जात आहे. परिणामी बदलत्या काळानुसार आता वेगवेगळ््या दिव्यांची निर्मिती केली जात असून त्यांच्या कित्येक व्हेरायटी बाजारात उपलब्ध होत आहेत. एवढेच काय तर आता चक्क कोलकात्यातील दिवे येथील बाजारात विक्रीसाठी आल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळे रंग, आकार व प्रकारांचे हे दिवे एकदा बघितल्यास मन मोहून घेणारे ठरत आहेत. म्हणूनच गोंदियाकरांना कलकत्याच्या या दिव्यांनी भुरळ घातली आहे.
येथील जयस्तंभ चौकात व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला दिवे व झुमरांचे दुकान थाटले आहे. रस्त्याने येता-जाता नागरिकाची नजर पडताच हमखास येथे थांबून ते दिव्यांची खरेदी करीत आहेत.
यामुळेच या व्यापाऱ्यांची चांगलीच कमाई होत आहे. महिलांकडूनही येथे चांगलीच गर्दी केली जात असून दिवाळीच्या दिवसासाठी दिवे खरेदी सुरू आहे.
दिव्यांना आक र्षक रंग व आकार
४कलकत्यातून आणलेले हे दिवे वेगवेगळे आकार व रंगांत उपलब्ध आहेत. पारंपारिक दिव्यांसह या व्यापाऱ्यांकडे साच्यापासून तयार केलेले विविध प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत. एकदा बघितल्यास नक्कीच त्यांची खरेदी करावी एवढे प्रकार या दिव्यांचे त्यांच्याकडे आहेत. खिशाला परवडणारे हे दिवे असल्याने गोंदियाकर आपला मोह आवरू शकत नसल्याचे दिसते.
पारंपरिक दिव्यांचा मान कायम
४बाजारात एकाहून एक आकर्षक दिवे विक्रीसाठी जरी उपलब्ध असले तरिही पारंपरिक दिव्यांचा ‘पणत्या’ मान मात्र कायम आहे. दिवाळीच्या दिवशी पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची प्रथा चालत आली असल्याने बहुतांश नागरिक कुंभाराने हाताने तयार केलेल्या जुन्या पारंपारिक दिव्यांचीच खरेदी करीत असताना दिसत आहेत. यातून आपली परंपरा जोपासली जात असतानाच कुंभारांच्या व्यवसायालाही अप्रत्यक्ष स्वरूपात मदत केली जाते.