खातीटोला येथे ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST2021-02-05T07:51:06+5:302021-02-05T07:51:06+5:30

याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी, आपल्याला काम करण्याची धुंदी असली पाहिजे, आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. कित्येक वेळा आपण गावच्या ...

Dedication of Gram Panchayat building at Khatitola | खातीटोला येथे ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण

खातीटोला येथे ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण

याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी, आपल्याला काम करण्याची धुंदी असली पाहिजे, आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. कित्येक वेळा आपण गावच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतो. सार्वजनिक कामांकडे कानाडोळा करतो व त्यामुळे गावाच विकास थांबतो. तेव्हा सर्व नागरिकांनी गावच्या विकासाकरिता समोर येऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य छाया दसरे, माजी उपसभापती डॉ.वसंत भगत, माजी प. स. सदस्य प्रकाश पटले, पवन पटले, अर्जुन नागपुरे, सरपंच शंकर टेंभरे, उपसरपंच रेखा मेश्राम, सुभाष साठवणे, ग्रा. प. सदस्य गेंदलाल चौधरी, राजेश ठाकरे, भूमेस्वर भोयर, धनवंता नेवारे, पुष्पा कटरे, श्यामकला चौधरी, भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव विवेक चौधरी, आत्माराम दसरे, प्यारेलाल चौधरी, ललिता ठाकरे, एस. टी. बीसेन, नरेंद्र ठाकरे, सुरेश चौरीवार, छत्रपती शहारे, माधुरी बारेवार, भूमेश ठाकरे व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Dedication of Gram Panchayat building at Khatitola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.