उपजिल्हा रुग्णालयात ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST2021-04-07T04:29:50+5:302021-04-07T04:29:50+5:30
बिरसी-फाटा : हॉटस्पॉट असलेल्या तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथील ...

उपजिल्हा रुग्णालयात ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ सुरू
बिरसी-फाटा : हॉटस्पॉट असलेल्या तिरोडा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारपासून (दि. ४) ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह २० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ (डीसीएचसी) सुरू करण्यात आले आहे.
या ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ (डीसीएचसी) मध्ये मल्टीपॅरा मॉनिटरसह सेंट्रल ऑक्सिजन, सेंट्रल सेक्शन आणि २४ तास प्रशिक्षित डॉक्टर्स व नर्सेस स्टाफ येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांमधील ऑक्सिजन स्तर ९५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच त्या रुग्णाला येथे भरती करून औषधोपचार केले जातात. जर रुग्णाचा ऑक्सिजनस्तर ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला गोंदिया येथील जीएमसी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे हलविण्यात येत असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले.