विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट
By Admin | Updated: May 14, 2016 01:49 IST2016-05-14T01:49:27+5:302016-05-14T01:49:27+5:30
अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट
विहिरींना बगल : विंधन विहिरींचे खोदकाम जोमात
रावणवाडी : अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पूनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.
पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहीर खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. कलांतराने आता विहीर खोदण्यासाठी लागणारी मोकळी जागा, विहीर खोदण्या नंतर विहीरीतून निघणारी माती अलवाची विन्हेवाट लावण्याचा प्रश्न यातूनच विंधन विहीर खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येतो. विंधन विहिरीमधून निघणारे पाणी शुद्ध व आरोग्यास हानीकारक राहत नसल्याने विहिरीस पर्याय म्हणून जिल्ह्यात ठिक-ठिकाणी हातपंप खोदकामास सुरूवात झाली आहे. विहीर उभारण्यासाठी भुपृष्टावर जवळपास ४० ते ६० फुट पर्यंत खोदकाम करावे लागते. मात्र विंधन विहीर खोदण्या करीता फार अल्पशी जागा लागत असून त्वरीत पाण्याचा उपसा सुरू होतो. हात पंपावर मोटारपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपशा केला जात असल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पावसाळ्यात पडलेले पाणी विहिरीमध्ये थेट जमा होते. मात्र हात पंपाचे तसे नाही पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी हात पंपात मुरतच नाही. पावसाचे पाणी ४० ते ५० फूटापर्यंत झिरण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी लागतो तत्पूर्ती जमीनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला असल्याने पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. विहिरीमधील पाणी व हातपंपामधील पाणी उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने सध्या उभारण्यात येणाऱ्या हातपंपासाठी आणखी खोल खोदावे लागत आहे. काही वर्षापूर्वी १५ ते २० फुटावर वाटेल तसे मुबलक पानी विहिरींना लागत होते. परंतु आता भुगर्भातील पाण्याची पातळी कमी आल्याने विहीर खोदने फार कमी झाले आहे. तसेच हात पंपासाठी ही जास्तीत जास्त खोदावे लागत आहे. या प्रकारावर वेळीच लक्ष दिले नाही तर काही वर्षात या भागात पाण्याकरिता हाहाकार होण्याची चिन्हे आतापासूनच दिसून येत आहे. (वार्ताहर)