शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

वैनगंगेच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर : जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १० गावांना पुराचा वेढा निर्माण झाला होता. यामुळे किडंगीपार आणि किन्ही येथील १०५ नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी सुरक्षीत स्थळी हलविले होते. मंगळवारी (दि.१०) वैनगंगा नदीच्या पातळीत ६ फुटाने घट झाल्याने जनजीवन पूर्वपदावर आले.तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे किन्ही येथील १०६ गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरक्षीत स्थळी हलविले होते. या नागरिकांची व्यवस्था गोंडमोहाडी येथील लक्ष्मणराव मानकर आदिवासी निवासी आश्रम शाळेत करण्यात आली होती. या नागरिकांच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली होती.तसेच जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी येथे भेट देऊन सोयी सुविधांचा आढावा घेतला.सोमवारी वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रातून रेती काढतांना चार जण पुरात अडकले होते. वैनगंगेच्या काठावर असलेल्या किन्ही येथे पुरात अडकलेल्या चार जणांना जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवित रेस्क्यू आॅपरेशन राबवून सुखरुप वाचविले. यात हमीरपूर येथील दीपलसिंह मोहनसिंह गौर, दौरया येथील संदीप महेंद्र यादव, बरेली येथील सुनीलसिंह बिरजलालसिंह चव्हाण व मुरादाबाद येथील रूहमसिंह देवीराम सैनी (३०) हे होते. हे चौघेही जेसीबी काढत होते. तेथे चारही बाजूने पाऊस आला.त्यावेळी ते चारही जेसीबीवर बसले होते. जिल्हाधिकारी कार्यालयच्या शोध व बचाव चमूने रेस्क्यू टिमने सुरक्षित बाहेर काढले. किशोर टेंभूर्णे, राजकुमार बोपचे,जसवंत रहांगडाले,धीरज दुबे, रवींद्र भांडारकर, चुन्नीलाल मुटकुरे, इंद्रकुमार बिसेन,अनिल नागपुरे, चंद्रशेखर बिसेन, मुरलीधर मुदोडकर यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबविले.या अभियानात पोलीस कर्मचारी सुभाष कश्यप, नरेश उईके, इमरान सैयद, संदीप कराडे, रूपेंद्र गौतम, गिरधारी पतेह, जबरान चिखलोंढे, बाबरे,गजभिये व जावेद पठान यांचा समावेश आहे.पुजारीटोला धरणाचे दरवाजे बंदसालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे एक फुटाने तर कालीसराड धरणाचे २ दरवाजे आणि संजय सरोवर धरणाचे २ दरवाजे मंगळवारी सकाळी उघडण्यात आले होते.या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र सायंकाळी ७ वाजता पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे बंद करण्यात आले.शहरात जोरदार पावसाची हजेरीदोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहरात जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. या पावसाचा फटका गणेशोत्सव मंडळांना सुध्दा काही प्रमाणात बसला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर