फुलांऐवजी ज्ञानाने डोके सजवा

By Admin | Updated: September 11, 2015 02:12 IST2015-09-11T02:12:09+5:302015-09-11T02:12:09+5:30

वाचनाचा छंद प्रत्येकाला असायला पाहिजे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात वाचनास अत्यंत महत्व आहे. सर्वांना वाचनाची सवय असावी त्यामुळे ज्ञानात भर पडते.

Decorate the head with wisdom instead of flower | फुलांऐवजी ज्ञानाने डोके सजवा

फुलांऐवजी ज्ञानाने डोके सजवा

जि.प.अध्यक्ष मेंढे : बिरसी शाळेत शालेय वाचनालयाचे उद्घाटन
गोंदिया : वाचनाचा छंद प्रत्येकाला असायला पाहिजे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात वाचनास अत्यंत महत्व आहे. सर्वांना वाचनाची सवय असावी त्यामुळे ज्ञानात भर पडते. म्हणून सर्व मुला-मुलींनी फुलांनी डोके सजविण्यापेक्षा ज्ञानाने डोके सजवावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित शालेय वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.९) त्या बोलत होते.
अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती हेमलता डोेये, उपसभापती ओमप्रकाश मटाले, पंचायत समिती सदस्य लोकेश अग्रवाल, सरपंच राजाराम राऊत, उपसरपंच मुन्नालाल खोब्रागडे, केंद्रप्रमुख डी.एल. गुप्ता, सरपंच पी.के. चौधरी, प्रल्हाद चौधरी, मंगरु अंबुले, बबीता बिसेन उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे यांनी, शाळेच्या पारिसराची प्रशंसा केली. स्पर्धात्मक युगाव व विज्ञान युगात वाचनाचे अत्यंत महत्व असल्याचे सांगितले. वाचनामुळे जीवन समृद्ध व सुसंस्कृत होते. म्हणून वाचनाची सवय प्रत्येक विद्यार्थ्यांना असावी असे मत व्यक्त केले. तसेच शाळेने विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी सुरू केलेल्या वाचनालयाच्या उपक्रमाची प्रशंसा केली.
दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनीही शाळेच्या या आगळ््यावेगळ््या उपक्रमाची प्रशंसा करीत आपले मत व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक एल.यु. खोब्रागडे यांनी प्रास्ताविकेत शाळेबद्दल सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना आपल्या वेळात वाचनाचा लाभ कसा घेता यावा म्हणून शालेय वाचनालय उघडण्याचा विचार पुढे ठेवून हे पाऊल सर्व शिक्षकांच्या सहमतीने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
संचालन शाळेच्या शिक्षिका वर्षा बावनथडे यांनी केले. आभार विकास लंजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अनिता मानकर, गितेश्वरी रिनाईत, मुनेश्वरी पारधी, ममता पटले, धनवंता पटले, सुषमा सोनवाने, उर्मिला बावनथडे, नरेश पटले, देवचंद सोनवाने, रामेश्वर पटले, वंदना नागरिकर, वच्छला उईके, आशा भावे, उईके, लता टेंभुर्णीकर, सुरेखा पंधरे, दिगंबर पटले, दिवाकर सोनवाने, प्रल्हाद पटले, नारायण अग्रवाल, टी.बी. बोपचे तसेच गावकरी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Decorate the head with wisdom instead of flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.