केशोरी परिसरात ओला दुष्काळ घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:28+5:30
यावर्षी मृग नक्षत्रापासून मान्सून बरसल्यामुळे धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती. ओलीताच्या शेतीसह विना ओलीताच्या शेतीत सुद्धा धान पिकाची लागवड करण्यास शेतकरी यशस्वी ठरला. वरुण राजाच्या कृपेमुळे पोळ्यापासून कोणत्याही प्रकारची उसंत न घेता सतत पाऊ स झाल्यामुळे हलके धानपिक सुद्धा पाण्यामुळे सडले.

केशोरी परिसरात ओला दुष्काळ घोषित करा
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : यावर्षी सुरुवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहिल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी विना ओलीताच्या शेतीमध्ये सुद्धा धान पिकाची लागवड केली होती. परतीच्या पावसाने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धान पिकावर तुळतुळा, करपा या किडरोगांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. परतीच्या पावसामुळे केशोरी परिसरात ओला दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट एकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
यावर्षी मृग नक्षत्रापासून मान्सून बरसल्यामुळे धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती.
ओलीताच्या शेतीसह विना ओलीताच्या शेतीत सुद्धा धान पिकाची लागवड करण्यास शेतकरी यशस्वी ठरला. वरुण राजाच्या कृपेमुळे पोळ्यापासून कोणत्याही प्रकारची उसंत न घेता सतत पाऊ स झाल्यामुळे हलके धानपिक सुद्धा पाण्यामुळे सडले.
भारी धान पिकांवर अधिकच्या पावसामुळे तुळतुळा आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव होऊन धानपिक नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे.काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरुन नुकसान भरपाईची विमा कंपनीकडे मागणी केली. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांचे काय होणार? या विवचनेत शेतकरी सापडला आहे.
शासनाने या परिसरात ओला दुष्काळ जाहीर करुन प्रती एकर वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.