दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:24 IST2017-09-02T21:24:10+5:302017-09-02T21:24:30+5:30

महाराष्टÑ राज्य किसान सभा व महाराष्टÑ राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन द्वारे शुक्रवारी गोरेगाव बस स्टँंड चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Declare drought and debt waiver | दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करा

दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करा

ठळक मुद्देहौसलाल रहांगडाले : तीव्र आंदोलनाचा इशारा, शेतकºयांना नुकसान भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : महाराष्टÑ राज्य किसान सभा व महाराष्टÑ राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन द्वारे शुक्रवारी गोरेगाव बस स्टँंड चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गोंदिया जिल्हा दुष्काळ जाहीर करा, शेतकºयांचे कर्ज माफ करा या महत्त्वाच्या मागण्यांचा यात समावेश होता.
शिष्टमंडळातर्फे विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. त्यात शेतकºयांचा सातबारा कोरा करा, स्वाभिमान आयोगाच्या शिफारशी नुसार लागत अधिक ५० टक्के अधिक भाव, वनहक्क जमिनीचे पट्टे, महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामावर ४०० रूपये मजूरी, सर्वांना पक्के घर, शौचालय व शेतकरी, शेतमजूरांना १०००० रुपये मासिक पेंशनचा कायदा करा अश्या विविध मागण्यांचा समावेश होता. या मागणीसाठी राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष भैयालाल कटरे, तालुकाध्यक्ष नारायण भलावी, बाबुलाल शहारे, चैतराम दियेवार, वहीदा खॉ पठाण यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजुराचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.
सदर निवेददन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना निवेदन देण्यात आले. मोर्च्यासमोर हौसलाल रहांगडाले म्हणाले, शेतकºयांच्या सुकाणु समितीद्वारे राज्यात अनेक ठिकाणी संप तिव्र आंदोलन केले. यानंतर कर्ज मुक्त करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले परंतु अजूनपर्यंत कर्ज मुक्ती मिळाली नाही.
पावसाच्या लहरीपणामुळे गोंदिया जिल्हा व विदर्भात दुष्काळ परिस्थिती आहे. परंतु अजून पर्यंत जिल्हा दुष्काळ जाहीर झाला नाही. अनेक वर्षापासून वन जमिनीवर ताबा असलेल्यांना पट्टे मिळाले नाहीत. गरजू लोकांना घरकुल शौचालय दिले नाही. २६ सप्टेंबरला जळगाव येथे सुकानुसमितीच्या बैठकीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येणार आहे.

Web Title: Declare drought and debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.