हल्लेखोराला पळपुटा घोषित करा
By Admin | Updated: April 30, 2016 01:53 IST2016-04-30T01:52:43+5:302016-04-30T01:53:52+5:30
आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करून फरार झालेल्या आणि गेल्या २०-२२ दिवसांपासून पोलिसांना सापडत नसलेल्या हल्लेखोर नगरसेवकाला पळपुटा घोषित करा,

हल्लेखोराला पळपुटा घोषित करा
काँंग्रेस कमिटीचे निवेदन : पोलीस अधीक्षकांकडे मागणी
गोंदिया : आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करून फरार झालेल्या आणि गेल्या २०-२२ दिवसांपासून पोलिसांना सापडत नसलेल्या हल्लेखोर नगरसेवकाला पळपुटा घोषित करा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गेल्या ९ एप्रिल रोजी आ.अग्रवाल यांची पत्रपरिषद सुरू असताना अचानक येऊन हल्ला करणाऱ्या आरोपी शिव शर्मा व इतरांना पोलिसांनी अटक केली नाही. २० दिवस लोटले तरी त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. या षडयंत्रातील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी माजी आ.रामरतन राऊत, प्रदेश सचिव डॉ.योगेंद्र भगत, माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, सहेषराम कोरोटे, डॉ.नामदेव किरसान, रमेश अंबुले, राधेलाल पटले, जि.प.सभापती पी.जी. कटरे, डॉ.बी. के. मेश्राम, देवेंद्र तिवारी आदी अनेक जण उपस्थित होते.