शर्माच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय
By Admin | Updated: April 26, 2016 01:39 IST2016-04-26T01:39:19+5:302016-04-26T01:39:19+5:30
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजप नगरसेवक शिव शर्मा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता

शर्माच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय
गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजप नगरसेवक शिव शर्मा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता मंगळवारी (दि.२६) सुनावणी होणार आहे. त्यांना मदत केल्यामुळे अटकेत असलेल्या दोघांना बुधवारपर्यंत (दि.२७) न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
शर्मा याने वकिलामार्फत १९ एप्रिल रोजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर सोमवारी सुनावणी होती. मात्र अर्जावर न्यायालयाने मंगळवारी (दि.२६) सुनावणी करण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे शिव शर्माला या प्रकरणात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी अनिमेष ऊर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे (रा. गजानन कॉलनी) व गजेंद्र रामचरण साते (रा. मरारटोली) या दोघांना अटक केली होती. दोघांचा पीसीआर संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.
यात त्यांना न्यायाधीश ए.बी. तहसीलदार यांनी पुन्हा ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या शिवाय नगरसेवक पंकज यादव यांच्यावर हल्ला करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
यातील दोन अल्पवयीन असून त्यांना सोडून राजा महेश सांडेकर (२१), निशांत उमेश छडीमलक, सौरभ बिरीया (रा.सावराटोली) व हरी नंदलाल चौधरी (३८, रा.मरारटोली) या चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी (दि.२५) त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडीत पाठविले आहे. (शहर प्रतिनिधी)
यादवप्रकरणी न्यायालयात एकाला पकडले
४विशेष म्हणजे सोमवारी यादव हल्ल्यातील आरोपींची सुनावणी होत असताना सावराटोली निवासी एक आरोपी न्यायालयात उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्या आरोपीला लगेच ताब्यात घेतले. हा आरोपी न्यायालयात बिनधास्त फिरत असल्यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याला यापूर्वी सावराटोली परिसरात एका गाडीत तलवारी लपवून ठेवल्याच्या आरोपात अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.