ध्येय ठरवा व कामाला लागा
By Admin | Updated: December 4, 2015 02:05 IST2015-12-04T02:05:12+5:302015-12-04T02:05:12+5:30
डोक्यात अनावश्यक बाबींचा कचरा साठवून गोंधळून जाण्यापेक्षा शासनाने आत्मशिक्षण करुन आपले ध्येय निश्चित करा.

ध्येय ठरवा व कामाला लागा
शिक्षणाधिकारी नरड : विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम
वडेगाव : डोक्यात अनावश्यक बाबींचा कचरा साठवून गोंधळून जाण्यापेक्षा शासनाने आत्मशिक्षण करुन आपले ध्येय निश्चित करा. ध्येयानुसार योजना ठरवा व सुसाट वेगाने कार्याला लागा. असा गुरुमंत्र शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांत जोश भरत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शालेय विद्यार्थ्याना स्वेटर वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती पी.जी. कटरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडविकास अधिकारी मानकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश अंबुले, पंचायत समिती सदस्य निता रहांगडाले, सरपंच तुमेश्वरी बघेले, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी ठाकरे, शोभेलाल दहीकर, राजेश कावळे, संभाजी ठाकरे, शोभेलाल दहीकर, राजेश कावळे, भोजराज पटले, तिकलचंद रहांगडाले, चंदू शर्मा, विनायक बडगे, प्राचार्य टी.टी. रहांगडाले, डॉ.जी.जी. बिसेन, दानदाते, रामकुमार असाटी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सभापती कटरे यांनी, जिल्हा परिषदेच्या हायस्कूलवर शिक्षकांची कमी ही बाब लवकरच इतिहासजमा होणार असून त्यादिशेने हालचाली सुरु आहेत. सदरची रिक्त पदे येत्या पंधरवाड्यात भरणार असून नववर्षापुर्वी विद्यालयाना पुरेपुर शिक्षक उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या निधीतून हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीकरिता सहा लाख रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी प्राचार्य टी.टी. रहांगडाले यांनी, शालेय विकास उपक्रम व प्रशासनातील अडचणी विशद करुन शालेय दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी स्व. शोभेलाल असाटी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नगरसेवक रामकुमार असाटी यांच्यावतीने इयत्ता ५ ते ८ च्या २४८ विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. संचालन वाय.के. नागपुरे यांनी केले. आभार पी.एस. मेश्राम यांनी मानले.