विद्युत तारांच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: July 21, 2015 01:16 IST2015-07-21T01:16:33+5:302015-07-21T01:16:33+5:30
तालुक्यातील बाम्हणी खडकी येथील शेतकरी उद्धव भेंडारकर यांचा लहान मुलगा गणेश (गुड्डू) उद्धव भेंडारकर हा १२

विद्युत तारांच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू
सडक अर्जुनी : तालुक्यातील बाम्हणी खडकी येथील शेतकरी उद्धव भेंडारकर यांचा लहान मुलगा गणेश (गुड्डू) उद्धव भेंडारकर हा १२ व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी रविवारी (दि.१९) सुटी असल्याने आपल्या शेतात बकऱ्या चारत असताना जवळील बहेकार यांच्या शेतातील जीवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने त्याचा मृत्यू पावला.
ही घटना रविवार सायंकाळी ५ वाजताची आहे. गणेश हा आपल्या बकऱ्या चारत असताना बहेकार यांच्या शेतात गेलेल्या जीवंत तारेला स्पर्श झाल्याने जागीच मरण पावला. भाऊ आला नाही म्हणून मोठा भाऊ शेतात गेला असता गणेश त्याला मृतावस्थेत आढळला.
वेळीच खबरदारी घेत त्याने गावात वार्ता पसरली व वेळीच विद्युत पुरवठा खंडीत करुन पोलिसांना पाचारण केले. गणेश हा हुशार विद्यार्थी असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)