घराच्या छतावरून पडून तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:51 IST2019-06-24T21:51:31+5:302019-06-24T21:51:47+5:30
देवरी तालुक्यातील ग्राम सावली येथे घराच्या छतवरून पडून तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२४) सकाळी १०.३० वाजतादरम्यान घडली. मृत तरूणीचे नाव दिक्षा देवनाथ बिंझलेकर (वय २४) असे आहे.

घराच्या छतावरून पडून तरुणीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : देवरी तालुक्यातील ग्राम सावली येथे घराच्या छतवरून पडून तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२४) सकाळी १०.३० वाजतादरम्यान घडली. मृत तरूणीचे नाव दिक्षा देवनाथ बिंझलेकर (वय २४) असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिक्षा सोमवारी सकाळी काही कामानिमित्त घराच्या छतवर गेली होती. तिचा तोल गेल्याने ती खाली पडली व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दिक्षा इंजिनिअर असून ती नागपूरच्या एका खासगी कंपनी कार्यरत असल्याचे संगीतले जात आहे.
विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात तिचा साखरपुडा गोंदिया तालुक्यातील ग्राम तुमखेडा येथील तरूणाशी झाला होता. या घटनेने सावली गावात शोककळा पसरली आहे.