कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

By Admin | Updated: April 24, 2017 00:34 IST2017-04-24T00:34:18+5:302017-04-24T00:34:18+5:30

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता देताना पेट्रोलची दरवाढ करून राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली.

Dearness Allowance for the employees | कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

शासनाचे धोरण अयोग्य : नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
गोंदिया : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता देताना पेट्रोलची दरवाढ करून राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत आणि महामार्गावरील दारूबंदीनंतर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने पेट्रोलची दरवाढ करून त्या नुकसानाची भरपाई केली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र सरकारच्या या दरवाढीवर अनेकांनी तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. शासनाचे हे दुटप्पी धोरण योग्य नसून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किंवा दारूबंदीने बुडालेल्या महसुलाच्या वसुलीसाठी हा पर्याय योग्य नाही, अशा प्रतिक्रीया नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Dearness Allowance for the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.