पैशासाठी मृतदेह १५ तास अडविला
By Admin | Updated: March 26, 2015 01:06 IST2015-03-26T01:06:43+5:302015-03-26T01:06:43+5:30
येथील गोंदिया हॉस्पीटलमध्ये निमोनियाचा उपचार घेण्यासाठी २ मार्च पासून दाखल झालेल्या चिमुकलीचा उपचार घेताना २२ दिवसानंतर मृत्यू झाला.

पैशासाठी मृतदेह १५ तास अडविला
गोंदिया : येथील गोंदिया हॉस्पीटलमध्ये निमोनियाचा उपचार घेण्यासाठी २ मार्च पासून दाखल झालेल्या चिमुकलीचा उपचार घेताना २२ दिवसानंतर मृत्यू झाला. परंतु तिच्या उपचाराचे दोन लाख १३ हजार रूपये भरा अन्यथा मृतदेह देणार नाही असे डॉक्टरांचे म्हणने असल्यामुळे त्यांनी १५ तास चिमुकलीचा मृतदेह देण्यात आला नाही असा आरोप मृत मुलीचे आई-वडील वैशाली देशमुख, संजय देशमुख यांनी केला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या कुंभीटोला बाराभाटी येथील वैशाली संजय देशमुख या महिलेची प्रसूती गुप्ता नर्सिंग होम मध्ये २ मार्च रोजी झाली. त्यानंतर तिच्या बाळाला निमोनियाझाल्यामुळे त्या बाळाला गोंदिया हॉस्पीटल येथे डॉ. उमेश शर्मा यांच्याकडे २ मार्च दाखल करण्यात आले. तेथील उपचार करतांना त्या बाळाच्या प्रकृतीत ५० टक्के सुधारणा झाली.
मंगळवारी अचानक घटनेच्या दोन तासापूर्वी त्यांनी मुलीला नागपूला न्या असा सल्ला दिला. त्यांनतर लगेचच तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
त्या मुलीचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्या मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी मानवाधिकार संघटनेचे जयेश उंदीरवाडे, निला ढोरे, निलकुमार अंबुले व अनेकांनी आक्रोश व्यक्त केल्यामुळे त्या मृतदेहाला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
अत्यंत खराब परिस्थीतीत त्या मुलीला दाखल करण्यात आले होते. तिचा उपचार केल्यानंतर काही दिवस प्रकृतीत सुधारणा झाली. परंतु नंतर पुन्हा प्रकृती बिघडत असल्यामुळे तिला नागपूरला नेण्याचा सल्ला दिला होता. त्यांची गरिब परिस्थीती पाहून त्यांच्या उपचाराचे पैसे सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना मृतदेह घेऊन जाण्यासाठी आम्ही फोन केला. त्यांनी एकदाही मृतदेह मागितला नाही.
डॉ. उमेश शर्मा गोंदिया हॉस्पीटल गोंदिया.