शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
4
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
5
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
6
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
7
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
8
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
9
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
10
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
11
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
12
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
13
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
14
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
15
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
16
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
17
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
20
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?

डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात देशातून प्रथम; एक कोटी पुरस्काराची मानकरी

By नरेश रहिले | Updated: April 20, 2025 19:28 IST

‘क्लायमेट ॲक्शन स्पेशिएल पंचायत अवॉर्ड’

गोंदिया: जिल्ह्यातील सडक- अर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२३ -२४ अंतर्गत भारत देशातून प्रथम पुरस्कार पटकविला आहे. हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी यावर ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘क्लायमेट ॲक्शन स्पेशिएल पंचायत अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला आहे. परिणामी ही ग्रामपंचायत एक कोटी पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तर कर्नाटक राज्यातील बिरडाहल्ली ग्रामपंचायतीने द्वितीय आणि बिहारच्या मोतीपूर ग्रामपंचायतीने तृतीय पुरस्कार पटकविला आहे.या पुरस्काराची घोषणा आज २० एप्रिल रोजी शासनाने केली आहे.

ग्रामपंचायत डव्वाच्या या विशिष्ट कामगिरीचे कौतुक करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक यांनी कौतूक केले आहे. डव्वा/स ग्रामपंचायतच्या सरपंच योगेश्वरी चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी सिंधू रामचंद्र सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे तापमाणात वाढ होत आहे. याचा परिणाम मानवी शरीर आणि वनस्पती पिकांवर होत आहे. हे थांबवायचे असेल तर आधी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे,असे सांगून घरोघरी सौर ऊर्जेचा वापर करणे, प्लास्टिक बंदी, फटाके बंदी अश्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही. एवढेच नाहीतर जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही याची जाणीव ठेवून आमच्या ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी सांगितले.

११ एप्रिल रोजी केली होती पाहणीभारतसरकार दिल्लीच्या चमुने ११ एप्रिल २०२५ रोजी या ग्रामपंचायतीची पाहणी केली. या चमूमध्य अनुराधा, नीलिमा गोएल या अधिकाऱ्यांचा समावेश होता. हा पुरस्कार मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरूगानंथम, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक, एस. आय. वैद्य,सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, उपसभापती निशा काशिवार, गट विकास अधिकारी रविकांत सानप, दिलीप खोटेले यांच्या मार्गदर्शनात विस्तार अधिकारी रवींद्र पराते, वाय. सी. पटले, उपसरपंच सुनील घासले, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि गावकरी यांच्या परिश्रमाचे फळ आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgram panchayatग्राम पंचायत