धाडसच ‘त्यांच्या’ जगण्याचा आधार
By Admin | Updated: November 2, 2015 01:25 IST2015-11-02T01:25:48+5:302015-11-02T01:25:48+5:30
चेहऱ्यावर मासूमी, पण थोडे दु:खही. एचआयव्ही पॉझिटिव्ह असणे म्हणजे सामान्यत: जीवनाचा शेवटच समझला जातो.

धाडसच ‘त्यांच्या’ जगण्याचा आधार
तीन हजार एचआयव्ही पॉझिटिव्ह : सहा महिन्यांत ११२ नवीन रूग्ण, चार नवजात एचआयव्हीबाधित
देवानंद शहारे गोंदिया
चेहऱ्यावर मासूमी, पण थोडे दु:खही. एचआयव्ही पॉझिटिव्ह असणे म्हणजे सामान्यत: जीवनाचा शेवटच समझला जातो. मात्र हे अपूर्ण सत्य आहे. धाडस ठेवून तेसुद्धा आपले जीवन जगू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालले तर असे लोकही लांब काळापर्यंत सामान्य जीवन जगू शकतात. गोंदिया जिल्ह्यात जवळपास तीन हजार लोक पॉझिटिव्ह आहेत. नोंदणीकृत २ हजार ८३ लोकांपैकी १ हजार ५०१ रूग्ण एआरटी (एन्टी रिट्रोव्हायरल थेरपी) घेत असून सामान्य जीवन जगू लागले आहेत.
सन २०१५-१६ मध्ये ११ हजार ७१० लोकांच्या तपासणीचे उद्दिष्ट होते. १४ हजार ३७० लोकांची तपासणी करण्यात आली. यात ११२ जण पॉझिटिव्ह आढळले. यात ६६ पुरूष, ४५ महिला व एका नपुंसकाचासुद्धा समावेश आहे. यापैकी ११० रूग्ण एआरटी घेत आहेत. त्यातच गरोदर महिलांच्या तपासणीचे (एएनसी) उद्दिष्ट नऊ हजार ठेवण्यात आले होते. त्यात १२ हजार ५८७ महिलांची तपासणी करण्यात आली. यापैकी १० महिला पॉझिटिव्ह आढळल्या. यात सहा महिला अशा होत्या, ज्या आधीपासूनच पॉझिटिव्ह होत्या. तर चार महिला नवीन पॉझिटिव्ह आढळल्या. पॉझिटिव्ह महिलांपासून जन्मलेल्या १७ बालकांची १८ महिन्यांनंतर करण्यात आलेल्या तपासणीत चार बालके पॉझिटिव्ह आढळले, तर १३ बालके सामान्य आढळले.
एचआयव्ही पीडितांची आठवड्यातून दोन दिवस, सोमवार व गुरूवारी सीडी-४ चाचणी केली जाते. नमुणे तपासणीसाठी नागपूरला पाठविले जातात. एआरटी घेणाऱ्यांमध्ये दुर्ग, राजनांदगाव, बालाघाट व इतर जिल्ह्यातील रूग्ण अधिक आहेत. गोंदियात ३० मार्च २०१० पासून एआरटी सेंटर सुरू आहे. गोंदिया सीमावर्ती जिल्हा असूनही येथील स्थिती सुखद आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गोंदियात खूप कमी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत.
गोंदियाच्या केंद्रात बाहेरचे रूग्ण
गोंदियाच्या जवळचे जिल्हे व जवळच्या राज्यातील रूग्णांची संख्या अधिक आहे. मध्य प्रदेशचे २५० व छत्तीसगडच्या १० रूग्णांची नोंदणी गोंदियाच्या केंद्रात करण्यात आली आहे. तसेच भंडारा व इतर जिल्ह्यातील काही रूग्णांचीही नोंद येथे आहे. हे सर्व रूग्ण एआरटीसाठी येतात. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात १०-१२ दिवसांपूर्वीच एआरटी सेंटर सुरू झाले आहे. हळूहळू तेथे रूग्णांना हलविण्यात येईल.
एचआयव्हीबाधित १६ रूग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात मागील वर्षी एचआयव्ही-एड्समुळे १२ रूग्णांचा मृत्यू झाला. यावर्षी आतापर्यंत चार रूग्णांचा मृत्यू झाला. यातील काही मृत्यू अशा आहेत, ज्या दुर्घटनेमुळे घडल्या. एचआयव्हीबाधित रूग्णांना ६० टक्के क्षयरोग (टीबी) होण्याचा धोका असतो. तर क्षयरूग्णांना १० टक्के एचआयव्ही असण्याची शक्यता असते. जर क्षयरोग असेल तर एचआयव्ही रूग्णांना मृत्यूचा अधिक धोका असतो. आरोग्य विभागाद्वारे सन २०१७ पर्यंत ‘गेटिंग टू झिरो’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे एचआयव्ही रूग्णांची संख्या शून्यापर्यंत आणावयाची आहे. नवीन जन्म घेणाऱ्या शिशूंना एचआयव्हीपासून वाचविणे, हा यामागील उद्देश्य आहे. आता याचे परिणाम हळहळू दिसू लागले आहेत.