शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दीड लाख लोकांची तहान भागविणारी डांर्गोली योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

तलाव व जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऋतुंचा मेळ निसर्गचक्रप्रमाणे असल्याने येथील जनजीवनावर फारसा दुष्परिणाम होत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असल्याने तिन्ही ऋतूंचा संगम येथे बघावयास मिळतो. मात्र मागील २ वर्षांत पावसाचा ताळमेळ थोडाफार जुळला नसल्याने पाणी टंचाईची थोडीफार झळ सोसावी लागली होती.

ठळक मुद्दे८९.७५ लक्ष लिटर पाणी पुरवठा। पाच टाकींमधून होतो शहराला पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून शहराला पाणी पुरवठा करणारी डांर्गोली पाणी पुरवठा योजना शहरासाठी जीवनदायीनी ठरत आहे.शहराला दररोज ८९.७५ लक्ष लिटर पाणी पुरवठा या योजनेतून केला जात असून शहरातील पाच पाणी टाकींमधून पाण्याचे वितरण होत आहे. शहरासाठीच्या या पाईप लाईनवर सुमारे आठ गावे असून त्यांचीही स्वतंत्र योजना असल्याने पाण्याचा प्रश्न कधी या गावांमध्ये निर्माण झाला नाही.तलाव व जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऋतुंचा मेळ निसर्गचक्रप्रमाणे असल्याने येथील जनजीवनावर फारसा दुष्परिणाम होत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असल्याने तिन्ही ऋतूंचा संगम येथे बघावयास मिळतो. मात्र मागील २ वर्षांत पावसाचा ताळमेळ थोडाफार जुळला नसल्याने पाणी टंचाईची थोडीफार झळ सोसावी लागली होती. पण जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे डोंर्गोली येथील योजनेतून शहराची ही समस्या यशस्वीरित्या सोडविण्यात आली होती. सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून शहराला पाणी पुरवठा केला जातो.यासाठी लगतच्या ग्राम कुडवा येथे जलशुद्धीकरण केंद्र असून तेथून शहरातील वेगवेगळया भागात असलेल्या पाच टाक्यांत पाणी दिले जाते. अशाप्रकारे दररोज ८९.७५ लक्ष लिटर पाणी या टाक्यांत जात असून त्यांच्याद्वारे शहरात पुरवठा केला जातो. म्हणूनच डांर्गोली योजनेला गोंदिया शहराची जीवनदायीनी म्हटले जाते.गावांचीही स्वतंत्र व्यवस्थाडांर्गोलीपासून गोंदियाला येत असलेल्या पाईपलाईन लगत ग्राम डांगोरली, दासगाव, निलज, गिरोला, लहीटोला, पांढराबोडी, जब्बारटोला व कुडवा ही गावे आहेत.यातील बहुतांश गावांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. शिवाय, गावातील विहिरी व बोअरवेलमुळे त्या गावांत पाणी पुरवठा होत असून कधी पाणी पेटल्याची स्थिती निर्माण होत नाही. परिणामी, पाण्याची चोरी किंवा पाण्यासाठी आंदोलनाची पाळी उद्भवलेली नाही. त्यातल्या त्यात एखाद्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यास किंवा देखभाल दुरूस्तीला घेऊन झालेली पाणी गळती सोडून अन्यथा पाणी गळतीची समस्याही जाणवत नाही.१५ हजार हेक्टरवर सिंचनडांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रालगत डांर्गोली उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून परिसरातील १५ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात येथील पाण्याची मदत होते.जब्बारटोला गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र सुविधा आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही. पाऊस कमी प्रमाणात झाल्यास थोडी समस्या जाणविते. मात्र भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही.- दिलीपसिंह गहरवार, गावकरीदासगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र सुविधा आहे.शिवाय पाण्याचे स्त्रोत देखील अधिक असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची फारशी समस्या जाणवित नाही. या भागात अद्याप पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसून स्थानिक ग्रामपंचायत यासाठी उपाय योजना राबवित असते.- पंचम गिरी, गावकरीगोंदिया तालुक्याला लागूनच वैनगंगा नदी वाहते. त्यामुळे या भागातील पाणी पातळी नेहमी चांगले असते. शिवाय सिंचनासाठी सुध्दा या नदीच्या पाण्याचा उपयोग शेतकरी करतात. या भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत नाही.- मुकेश जगणे

टॅग्स :DamधरणWaterपाणी