पवनाराच्या जीर्ण पुलावरून ‘धोकादायक’ वाहतूक

By Admin | Updated: July 23, 2016 23:58 IST2016-07-23T23:58:55+5:302016-07-23T23:58:55+5:30

तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारातील जून्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत.

'Dangerous' traffic from the old bridge of Pawanara | पवनाराच्या जीर्ण पुलावरून ‘धोकादायक’ वाहतूक

पवनाराच्या जीर्ण पुलावरून ‘धोकादायक’ वाहतूक

सुरक्षा कठडे गायब : निसरड्या रस्त्यामुळे वाहकांना धोका, पुलावर आहे भगदाड
तुमसर : तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारातील जून्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूचे बॅरीकेट्स गायब आहेत. वळणावर हा पूल असून पावसाळ्यात रस्ता निसरडा झाला आहे. बाजूला येथे नवीन पूल तयार होत आहे. या मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
निसर्गरम्य वातावरण पावसाचे दिवस मनाला निश्चितच आनंद देतात, परंतु निसरड्या रस्त्यावर वेगवान वाहने चालविताना प्र्रवाशांच्या वाहनाला धोक्याची शक्यता आहे. तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारात जूने आयुष्य संपलेल्या पूलावर मोेठे खड्डे पडले आहेत. वळणावर हा मार्ग असून नवीन प्रवाशांना या पूलाचा अंदाज येत नाही.
पूलावर मोठा भगदाड पडला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा भगदाड तात्पूरता बंद केला, परंतु वाहनांच्या वाहतुकीमुळे खड्डा काही प्रमाणात उघडा पडला आहे. पूलाच्या दोन्ही बाजूल स्पीड ब्रेकर संबंधित विभागाने तयार केले होते.
पूलाची उंची खूप जास्त आहे. निसरड्या रस्त्यामुळे वाहने निसरडण्याची शक्यता निश्चित आहे. पूलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा कठडे गायब आहेत. या पूलाच्या समांतर नवीन पूलाचे बांधकाम सुरू आहे. संबंधित विभागाने सुरक्षेची उपाययोजना म्हणून तत्काळ सुरक्षा कठडे लावण्याची गरज आहे. रहदारीच्या मार्गावर संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)

पवनारा पूल खूप जूना आहे. पूलावरील खड्डे यापूर्वी बुजविण्यात आले होते. परंतु त्यातील साहित्य वाहतुकीमुळे निघणे सुरूच राहते. सुरक्षा कठडे येथे लावण्याची कारवाई करण्यात येईल.
-बी.के. परिहार, कनिष्ठ अभियंता, सा.बा. विभाग, तुमसर.

 

Web Title: 'Dangerous' traffic from the old bridge of Pawanara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.