मूर्री मार्गावरील प्लास्टिक फॅक्टरीला भिषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 00:56 IST2017-04-27T00:56:42+5:302017-04-27T00:56:42+5:30
शहराच्या मूर्री रस्त्यावरील एका प्लास्टीक फॅक्टरीला २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भीषण आग लागली.

मूर्री मार्गावरील प्लास्टिक फॅक्टरीला भिषण आग
प्राणहाणी नाही : दोन तासानंतर आगीवर नियंत्रण
गोंदिया : शहराच्या मूर्री रस्त्यावरील एका प्लास्टीक फॅक्टरीला २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अशग्नीशमन विभागाच्या चार वाहनांच्या मदतीने दोन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.
राधेश्याम चतुर्भूज मुंदडा यांची शहराच्या मूर्री रस्त्यावर प्लास्टीक फॅक्टरी आहे. मुंदडा गोंदियात नसल्याचे सांगितले जाते. सकाळी ११ वाजता फॅक्टरीमधून आगीचे लोळे बोहर येत असताना जवळ राहणाऱ्या लोकांनी याची माहिती अग्नीशमन विभागाला दिली. अग्निशमन वाहन चालक जाकिर बेग, लोकचंद कावडे व जितेंद्र गौर हे तीन वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले. त्यानंतर अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रकाश कापसे वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले. फायरमन नरेंद्र बिसेन, कमल राखडे, ब्रिजेश बैरीसाल, रमेश खैरवार यांच्या मदतीने २ तास आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या फॅक्टरीमध्ये प्लास्टीकचे तुटलेले साहित्य भरले होते. या फॅक्टरीचे मालक गोंदियातून बाहेर असल्यामुळे या आगीत कितीचे नुकसान झाले हे कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)