घाणीच्या साम्राज्याने वनचौकी धोकादायक

By Admin | Updated: September 29, 2016 00:21 IST2016-09-29T00:21:53+5:302016-09-29T00:21:53+5:30

नगरातील आंबेडकर चौकाशेजारी असलेल्या वनचौकीच्या मागे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पावसाळ्याचे पाणी साचले आहे.

Dangerous empire is threatening forest | घाणीच्या साम्राज्याने वनचौकी धोकादायक

घाणीच्या साम्राज्याने वनचौकी धोकादायक

कुंभारटोली ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी
आमगाव : नगरातील आंबेडकर चौकाशेजारी असलेल्या वनचौकीच्या मागे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पावसाळ्याचे पाणी साचले आहे. साचलेले पाणी निळे झाले. पाण्याची दुर्गंधी येत आहे. मात्र ग्रामपंचायत कुंभारटोली पाणी काढण्याकरिता जे उपाय पाहिजे ते करीत नसल्याचे गली शेजारील अनेक नागरिकांनी आरोप केला आहे.
आंबेडकर चौकाकडून रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या डाव्या बाजूला अनेकांचे अनेक व्यवसाय सुरू आहेत. मात्र या दुकानाच्या मागे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सदर पाणी निळे झाले आहे. अनेक दुर्गंधी युक्त सामान पाण्यात असल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बस चौकीच्या मागील परिसर जरी शासकीय असला तरी पाण्याचा निकास करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. सदर परिसर ग्रामपंचायत कुंभारटोली अंतर्गत येत आहे.
साचलेले पाणी जाण्यास प्रशस्त मार्ग नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग व रोहयोच्या सहकार्याने ही व्यवस्था होणे गरजेचे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागात कोण अधिकारी किंवा कोण कर्मचारी हे शोधणे कठिण झाले आहे. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मात्र पडलेल्या खड्यांना बुजविण्याकरिता कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही.
वन चौकीच्या मागे साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येणे सुरू झाले आहे. तेथून देवरी मार्गावर उजव्या बाजूला अनेक अतिक्रमण धारकांचे दुकान आहेत. त्यामागेसुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे.
पडलेला कचरा पाण्याने कुजला असून त्याचीसुद्धा दुर्गंधी येत आहे. मात्र ग्रामपंचायत कुंभारटोली व सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो या समस्येच्या निराकरणासाठी प्रयत्नशील नसल्याने नागरिकांत व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. त्वरित उपाययोजना करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dangerous empire is threatening forest