उघड्या विद्युत डीपीमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:44+5:30

प्राप्त माहितीनुसार, विवेक मंदिर स्कूल हरि ओम कॉलनी, छोटा गोंदिया रोडवरील डिपीचे दार तुटलेले आहे. याची माहिती या परिसरातील वायरमनला देण्यात आली आहे. पण गेल्या वर्षभरापासून या विभागाने याची दखल घेतली नाही. या परिसरात ० ते ८ वयोगटातील १५-२० मुले आहेत. २ दिवसांपूर्वी एक मांजर या विद्युत डिपीचा शॉक लागून मृत्यूमुखी पडली.

Danger due to open electrical DP | उघड्या विद्युत डीपीमुळे धोका

उघड्या विद्युत डीपीमुळे धोका

ठळक मुद्देवर्षभरापासून समस्या कायम : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष, धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील विवेक मंदिर स्कूल रोड हरि ओम कॉलनी छोटा गोंदिया परिसरातील एका विद्युत डिपीचे दार तुटले आहे. परिणामी विद्युत डिपी उघडी असून यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे अनेकदा तक्रार केली. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे धोका कायम असून रविवारी (दि.२६) एक घटना नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळली.
प्राप्त माहितीनुसार, विवेक मंदिर स्कूल हरि ओम कॉलनी, छोटा गोंदिया रोडवरील डिपीचे दार तुटलेले आहे. याची माहिती या परिसरातील वायरमनला देण्यात आली आहे. पण गेल्या वर्षभरापासून या विभागाने याची दखल घेतली नाही. या परिसरात ० ते ८ वयोगटातील १५-२० मुले आहेत. २ दिवसांपूर्वी एक मांजर या विद्युत डिपीचा शॉक लागून मृत्यूमुखी पडली.
रविवारी (दि.२६) सकाळी एक मुलगा त्यामध्ये सळी मारताना आढळला. ही बाब कल्पेश सिंगनजुडे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर मुलाला वेळीच सावध केल्याने मोठी घटना टळली.
या पसिरात लहान मुले नेहमी खेळत असतात. त्यामुळे एखाद्या वेळेस त्यांच्या पालकांचे लक्ष नसल्यास जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत उघड्या असलेल्या विद्युत डिपीचे दार त्वरीत लावून धोका टाळावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Danger due to open electrical DP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज