कोरोनाच्या संकटाने नृत्य कलावंत मरनासन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:55+5:302021-04-22T04:29:55+5:30
गोंदिया : कोरोना वैश्विक महामारीने सगळ्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्याची नवीन उमेद निर्माण झाली ...

कोरोनाच्या संकटाने नृत्य कलावंत मरनासन्न
गोंदिया : कोरोना वैश्विक महामारीने सगळ्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्याची नवीन उमेद निर्माण झाली होती. त्यातच आता कोरोनाच्या दुसरा लाटेने पुन्हा लॉकडाऊन म्हणजेच ब्रेक द चेन या नव्या संकटाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. याचीच झळ नृत्य कलावंतांना सुद्धा बसत आहे.
डान्स क्लास हा एक मौजमजेचा करमणुकीचा,वजन कमी करण्याचा प्रकार किंवा मुलांच्या गुणदर्शन करिताचा एक प्रकार म्हणून समाजात प्रसिद्ध आहे. मात्र महाराष्ट्रातील एक लाखांहून अधिक तरुण तरुणी नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या अंगभूत कलेचा जोरावर जगत आहेत. याचा सरकारला विसर पडला आहे. नृत्य करणारे हे कलावंत कलेच्या दुर्दम्य इच्छाशक्ती झपाटले पण आणि कलेच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने मापदंड प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन जगत आहेत. महाराष्ट्रातील नृत्य वर्ग चालवणारे हे नृत्य कलाकार विशेषता तीन पठडीत काम करताना आढळतात, एक शास्त्रीय नृत्य, दोन लोककलावंत आणि तीन वेस्टन डान्स यातील शास्त्रीय नृत्य सोडली तर इतर दोन कला प्रकारांमध्ये कलाकार हे साधारणपणे बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आढळतात त्यामुळे नोकरी मिळवणे,चांगले जीवनमान आर्थिक मोबदला त्यांना मिळवता येत नाही. यातील अनेक कलाकारांचे डान्स क्लासेस हे भाडेतत्त्वावर असल्यामुळे उत्पन्नातील अधिकांश भाग हा जागेच्या घरभाड्यापोटी त्यांना द्यावा लागतो.
शालेय स्नेहसंमेलन, स्पर्धा ,चॅनेलचे कार्यक्रम,व्यवसायिक इवेंट आणि लग्न समारंभातील संगीत अशा अनेक माध्यमातून हा व्यवसाय महाराष्ट्रात उद्याच लागला असतानाच हे संकट आपल्यावर येऊन ठेपले आणि या सर्व कलाकारांचे जगणे दुरापास्त बनून गेले आहे. नृत्य वर्गावर अवलंबून असणाऱ्या ५० टक्क्यांहून अधिक कलाकारांचे घरे स्वतःचे नाहीत त्यामुळे त्यांचे घरची भाडे, किराणा, मुलांची शिक्षणे, कर्जे, त्यांचे हप्ते या यामुळे या व्यवसायावर निर्भर असणारे हे कलाकार आता रस्त्यावर आले आहेत. नृत्य शिकवणारे म्हणून शिक्षक अर्थात सर बनले मात्र शिक्षकांचा दर्जा मात्र समाजाने त्यांना कधीही दिला नाही स्वतःच्या अंगभूत कलागुणांनी प्रसिद्ध झालेले हे कलाकार आता बँकेचे हप्ते आणि उसने घेतलेले पैसे परत देता येत नसल्याने त्यांच्यावर बिकट संकट ओढावले आहे. महाराष्ट्रातील नृत्य कलाकार शासनाकडे मदतीसाठी आस लावून बसला आहे. त्यांची मागणी फक्त एकच की आठवड्यातून दोन दिवस फक्त दोन तास तरी त्यांना त्यांच्या क्लास घेण्याची परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र नृत्य परिषदेने केली आहे.
....