शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

दुसऱ्यांदा सोडले पुजारीटोला धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 8:50 PM

शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी सोडले होते.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी : शहराला दिवसातून एकच वेळ पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात २.३३ दलघमी पाणी सोडले होते. मात्र हा पाणीसाठा संपल्याने शनिवारी (दि.११) पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांवरील पाणी टंचाईचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी याप्रमाणे दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली.यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व मजीप्राने ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी आणून ते डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्यात आले. मागील महिन्यात पहिल्या टप्प्यात पुजारीटोला धरणात २.३३ दलघमी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हे पाणी महिनाभर पुरले. पण पाणीसाठ्यात पुन्हा घट झाल्यामुळे पुजारीटोला धरणातून शनिवारी (दि.१२) सकाळी पाणी सोडण्यात आले. एक दोन दिवसात हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचेल.त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. तीन वर्षांपूर्वीच १०० कोटी रुपये खर्चून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. मात्र ही योजना कार्यान्वीत झाल्याच्या पहिल्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. त्यामुळे या योजनेवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी सुध्दा पुजारीटोला धरणातून दोनदा पाणी सोडण्यात आले होते. दोन टप्प्यात ५.५३२ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. तर यंदा पहिल्या टप्प्यात २.३३ आणि आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सोडण्यात आले आहे. जवळपास मागील वर्षी एवढेच पाणी यंदा सुद्धा सोडावे लागणार आहे. अन्यथा शहरात पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यंदा तीनदा सोडावे लागू शकते पाणीमागील वर्षी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानंतर दोनदा पुजारीटोला धरणाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात करण्यात आली होती. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर आहे.त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा पाणी सोडावे लागले आहे. हे पाणी जवळपास १० जून पर्यंत पुरेल. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्यास पुन्हा तिसऱ्यांदा पुजारीटोला धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी सुध्दा आरक्षित करुन ठेवण्यात आले आहे.टिल्लू पंपांनी वाढविली समस्यामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरवासीयांना आधीच दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे.त्यातही पुरवठा सुरू होताच काही ग्राहक टिल्लू पंप लावून पाणी खेचून घेत आहे.त्यामुळे सर्वांना पाणी मिळण्याची अडचण होत आहे. प्राधिकरणाने टिल्लू पंपधारकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळताच कारवाईला सुरूवात करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई