दलित वस्तीची बोअरवेल आदिवासी परिसरात
By Admin | Updated: November 13, 2015 01:50 IST2015-11-13T01:50:55+5:302015-11-13T01:50:55+5:30
जवळील कुंभीटोला गावामध्ये दलित वस्ती योजनेंतर्गत दलितांच्या परिसरात बोअरवेल मिळाली.

दलित वस्तीची बोअरवेल आदिवासी परिसरात
अन्यायाची भावना : कुंभीटोला येथील प्रकार, खोदकामाची परवानगी नाही
बाराभाटी : जवळील कुंभीटोला गावामध्ये दलित वस्ती योजनेंतर्गत दलितांच्या परिसरात बोअरवेल मिळाली. परंतु ती बोअरवेल काही लोकांनी अफरातफर करुन बोअरवेल खोदकाम करणाऱ्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी आदिवासी मोहल्ल्यात खोदकाम करून उभी करण्यात आली. त्यामुळे दलित वस्तीतील मंजूर बोअरवेल आदिवासी मोहल्ल्यात कशी तयार करण्यात आली? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
अर्जुनी मोरगाव-कोहमारा मार्गावरील कुंभीटोला या गावामध्ये ना. राजकुमार बडोले यांच्या स्थानिक निधीतून दलित वस्ती योजनेंतर्गत दलित लोकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल खोदकामासाठी अधिकारी लोकांनी पाहणी केली. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास काही समाजकंटकांनी ती दलितांची बोअरवेल हलबा-हलबी आदिवासी मोहल्ल्यात खोदकाम करण्यास सांगितले असून दलितांवर अन्याय केल्याचे बोलले जात आहे.
सदर बोअरवेल खोदकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, असे ग्रामपंचायत कुंभीटोला येथील ग्रामसेवकाने सांगितले. बोअरवेलची अफरातफर करणारे राजकारणी लोक आहेत आणि राजकारणाचा मुद्दा समोर ठेऊन त्यांनी दलितांची बोअरवेल आदिवासी मोहल्ल्यात नेली. त्याच मोहल्ल्यात ग्रामपंचायत कुंभीटोला यांचा १५ हजार लिटरचा जलकुंभ ५० मीटर अंतरावर आहे. नळ योजना सुरु आहे. मात्र दलित वस्ती आणि मिळालेली बोअरवेल ही पूना नाईक, भिमराव चर्जे यांच्या दारासमोर उभी करुन समाजकंटकांनी दलितांवर मोठाच अन्यात केला आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, याकरिता पंचायत समिती, तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य बाराभाटी, ग्रामपंचायत कार्यालय आणि गावातील पदाधिकारी पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी दलित लोकांना न्याय मिळवूृन द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)