शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

दुग्ध व्यवसायाने ‘हस्तकला’स मिळाला जगण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:37 PM

आजारामुळे पतीवर बेरोजगारीची पाळी आली असताना तिरोडा तालुक्याच्या गोंडमोहाळी येथील निशांत स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य हस्तकला सोहनलाला ठाकरे यांनी गटाच्या मदतीमुळे आपले कुटुंब सांभाळले.

ठळक मुद्देनिशांत स्वयंसहायता महिला बचत गट : दोन म्हशीपासून दररोज ३० लिटर दुधाचे उत्पादन

आॅनलाईन लोकमतगोंदिया : आजारामुळे पतीवर बेरोजगारीची पाळी आली असताना तिरोडा तालुक्याच्या गोंडमोहाळी येथील निशांत स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य हस्तकला सोहनलाला ठाकरे यांनी गटाच्या मदतीमुळे आपले कुटुंब सांभाळले. गटातून कर्ज घेवून त्यांनी पशू पालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला व परिस्थितीवर मात केली. त्यात त्यांच्या पतीलाही रोजगार मिळाला.हस्तकला यांच्या कुटुंबात त्या, दोन मुले व पती असे चार सदस्य आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. पण त्यावर उदरनिर्वाह होत नसल्याने पती अदानी पॉवरमध्ये कामाला जात होते. तेथे काम करीत असताना त्यांचे आरोग्य बिघडले. नातलगांकडून ४५ हजार रूपये उसणे मागून उपचार करावा लागला. जीव संकटात असल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आली होती.अशातच सहयोगिनी व सीआरपी वस्तीत येत व बचत गट बनविण्याबाबत मार्गदर्शन करीत असत. पण महिलांची भांडणे होतात या समजुतीपायी त्या गटात जाण्याचे नाकारत असत. घरची परिस्थिती सुधरली पाहिजे व चांगले जीवन जगले पाहिजे असा विचार करत असताना, एक दिवस हस्तकला यांच्या शेजारच्या घरी सहयोगिनी व सीआरपी यांची बैठक सुरू होती. त्यात कर्ज मिळवून व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन सुरू होते. ते पाहून व ऐकून घेतल्यावर सायंकाळी पतीला सांगून बचत गट तयार करण्याचा निर्णय घेतला.दर महिन्यात बचत भरताना गटावरचा विश्वास वाढत गेला. सीआरपीच्या मार्गदर्शनात हस्तकला यांनी शेळीपालनासाठी १० हजार रूपयांचे कर्ज घेतले. दोन वर्षात व्याजासह परतफेड केल्यावर १५ हजार रूपयांच्या शेळ्या शिल्लक राहिल्या. दरम्यान सहयोगिनी व सीआरपी यांच्या मार्गदर्शनात एमएलपीची संकल्पना गावात रूजविण्यात आली. सुरभी दुग्ध संकलन केंद्र सप्टेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. एमएलपीमध्ये त्या सभासद बनल्या.यानंतर सहयोगिनी व सीआरपी यांच्या मार्गदर्शनात आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेवून म्हैस घेण्याचा निर्णय घेतला. सलग दुसºयांदा गटाने एक लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून हस्तकला यांनी ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून म्हैस खरेदी करून दुग्ध संकलन केंद्रात दूध देणे सुरू केले. दर आठवड्याला दुधाचे पगार नियमित होत असल्याने कर्जाचे हप्ते भरणे सोईचे झाले. दुधाला मिळालेल्या रास्त दरामुळे त्यांचे पती बोदा या शेजारच्या गावातून ४० लिटर दूध आणून दुग्ध संकलन केंद्रात विकतात. झालेल्या नफ्यातून त्यांनी आणखी एक दुसरी म्हैस खरेदी केली.तसेच दुग्ध ग्राहकांना पशू खाद्य पुरविण्याचा व्यवसायही सुरू केला. त्यात त्यांना प्रति किलोमागे दोन रूपयांचा नफा होतो. तर दोन म्हशींपासून दिवसाला ३० लिटर दुग्ध उत्पादन होते. त्या दुधाला प्रतिलिटर २४ रूपये दर मिळते. त्यानुसार प्रतिदिवस ७२० रूपये मिळतात. तर दिवसाकाठी म्हशीला ८ किलो पशुखाद्य लागतो. त्याला २२ रूपयांप्रमाणे १७६ रूपये खर्च येतो. किरकोळ खर्च १०० रूपये लागतो. अशाप्रकारे दिवसाकाठी त्यांना ५२० रूपये शुद्ध नफा मिळत आहे.१०० रूपये प्रत्येकीची मासिक बचततिरोडा तालुका स्थळापासून १८ किमी अंतरावर धापेवाडा-गोंदिया मार्गावर गोंडमोहाडी गाव आहे. गावात ग्रामपंचायत असून एकूण लोकसंख्या २०९५ आहे. गावात माविम अंतर्गत महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एकूण २३ बचत गट आहेत. त्यापैकीच निशांत स्वयंसहायता महिला बचत गट आहे. त्यात एकूण १२ महिला असून १०० रूपये प्रत्येकी मासिक बचत गोळा करतात. गटाची मासिक बैठक ५ तारखेला होते. गटाच्या अध्यक्ष प्रभा राऊत व गीता ठाकरे आहेत.गटामुळे जीवन बदललेहस्तकला यांना आता एक गाय खरेदी करायची आहे. तसेच पशुखाद्य दुकान सुरू करायची आहे. काहीतरी कमवू व आपला संसार सांभाळू, अशी जिद्द मनात असावी. त्यांचे पतीसुद्धा त्यांना व्यवसायात मदत करतात. आज कितीही संकटे आली तरी गटाचा आधार आहे, असे वाटते. गटात नसती तर हा बदल पहायला मिळाला नसता. गटामुळे जीवन बदलले, असे सांगून त्यांनी प्रभाग समन्वयक, सहयोगिनी, सीआरपी व माविमचे आभार मानले.