शेंडा वनक्षेत्रात सागवान वृक्षाची कत्तल व तस्करी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:33 IST2021-08-21T04:33:17+5:302021-08-21T04:33:17+5:30
सडक-अर्जुनी : सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेंडा परिसरातील कोयलारी बीट मधील पुतळी व प्रधानटोला शिवारातील जंगलातून मोठ्या ...

शेंडा वनक्षेत्रात सागवान वृक्षाची कत्तल व तस्करी ()
सडक-अर्जुनी : सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेंडा परिसरातील कोयलारी बीट मधील पुतळी व प्रधानटोला शिवारातील जंगलातून मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. एवढेच नव्हेतर इतर लाकडांमध्ये मिश्रित करून सागवानाची तस्करी होत आहे. याकडे वनविभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग कार्यरत करण्यात आले आहे. मात्र ‘कुंपणच खाऊ लागले शेत’ तर वन संपदेचे संरक्षण कसे होणार? या म्हणीची प्रचिती येथे येत आहे. कोयलारी बीटमधील पुतळी व प्रधानटोला शिवारात मोठ्या प्रमाणत सागवन वृक्षांची तस्करी केली जात आहे. हा प्रकार जंगल शिवारातून कापलेल्या सागवान वृक्षांच्या खुंटावरून उघडपणे दिसून येत आहे. असे असले तरी वनविभागाचे अधिकारी मात्र, या सर्व प्रकारापासून अनभिज्ञच आहे. मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रामधील सागवान झाडांची कत्तल केली जात असून संरक्षण करणारे वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. यामुळे शासनाला मिळणाऱ्या कोट्यवधीच्या महसुलाला चुना लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेण्याची मागणी केली जात आहे.