सांस्कृतिक राष्ट्रवाद हीच पक्षाची विचारधारा

By Admin | Updated: July 30, 2016 00:16 IST2016-07-30T00:16:37+5:302016-07-30T00:16:37+5:30

भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा व अखिल भारतीय स्तरावर संघटनात्मक व्यवस्था या गोष्टींमुळे

The cultural ideology of cultural nationalism | सांस्कृतिक राष्ट्रवाद हीच पक्षाची विचारधारा

सांस्कृतिक राष्ट्रवाद हीच पक्षाची विचारधारा

उपेंद्र कोठेकर : भाजपचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान
गोंदिया : भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा व अखिल भारतीय स्तरावर संघटनात्मक व्यवस्था या गोष्टींमुळे पक्षाला ‘पार्टी विथ द डिफरन्स’ म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडताना अनेक महत्वाच्या राजकीय, सामाजिक चळवळीतून पक्ष पुढे आला आहे. आपलेपणा, सामूहिकतेच्या भावनेतून संघटनेची कार्य करण्याची पद्धत आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद ही पक्षाची विचारधारा असून एकात्म मानवतावाद या तत्वार पक्ष कार्य करतो. शोषित, पीडित, अंतिम घटकाचा विकास हेच आमचे लक्ष असून राष्ट्राला पुढे नेण्यासाठी पक्ष कार्य करतो. भारतीय जनता पक्षाचे कोणी मालक नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे प्रतिपादन विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले.
ते तीन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाच्या समारोपिय सत्रात मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. अतिथी म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, डॉ. खुशाल बोपचे, दयाराम कापगते, केशवराव मानकर, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, भेससिंह नागपुरे, विनोद अग्रवाल, अशोक इंगळे, नेतराम कटरे, नगराध्यक्ष कशीश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, संजय नागपुरे, महिला मोर्चा प्रदेश सदस्य सीता रहांगडाले, जि.प. सदस्य देवराम वडगाये, छाया दसरे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, संजय कुळकर्णी, सविता इसरका उपस्थित होते.
कोठेकर पुढे म्हणाले, भाजप सरकारने देशाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी अनेक योजना आणल्या. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना गरजूपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवन बदलविण्यासाठी कार्य करावे. तर आगामी निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी ‘जे बोलू, ते करू’ या पद्धतीने कार्य करण्यास सांगितले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखंड भारत व देश एकसंघ ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. जात, पात, धर्म बाजूला सारून सांस्कृतिक परंपरा घेवून भाजप कार्य करीत आहे. पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयच्या मार्गाने राष्ट्राचा विकास करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातून होत असल्याचे सांगितले.
सदर प्रशिक्षण वर्गात जिल्ह्यातील २५८ कार्यकर्ते उपस्थित होते. एकूण १२ सत्रातून विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पक्षात राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित, सामाजिक हित जोपासण्याची विचारधारा असून राष्ट्रविकासासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष पटले यांनी प्रास्ताविकातून सांगितले. संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले.
तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्यासह चमूचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात पंकज सोनवाने, ऋषिकांत शाहू, अरविंद तिवारी, दुर्गाप्रसाद ठाकरे, अजित टेंभरे, अजय लौंगानी, विनोद बन्सोडे, धर्मेंद्र डोहरे, अनुराग शुक्ला, योगेंद्र हरिणखेडे, निरज ठाकूर, विनोद मानकर आदींचा समावेश होता.
प्रशिक्षणादरम्यान दररोज सकाळी योगाभ्यासचे वर्ग घेण्यात आले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सुगम संगीत व भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हा महामंत्री भाऊराव उके, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, मंडळ अध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, डॉ. लक्ष्मण भगत, विजय बिसेन, प्रमोद संगीडवार, परसराम फडे, भाऊराव कठाणे, उमाकांत ढेंगे, सलाम शेख, पप्पू कटरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: The cultural ideology of cultural nationalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.