दगडाने ठेचून हत्या

By Admin | Updated: March 19, 2015 01:08 IST2015-03-19T01:08:11+5:302015-03-19T01:08:11+5:30

येथून जवळच असलेल्या इर्री परिसरात दगडाने ठेचून एका इसमाचा खून करण्यात आला.

Crushed stone | दगडाने ठेचून हत्या

दगडाने ठेचून हत्या

गोंदिया : येथून जवळच असलेल्या इर्री परिसरात दगडाने ठेचून एका इसमाचा खून करण्यात आला. त्याची ओळख पटू नये म्हणून त्याला तणसाच्या ढिगात लपवून ठेवण्यात आले होते. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
इर्री येथील एक गुराखी जनावरे चारण्यासाठी गेला असताना त्याचा बैल त्या घटनास्थळाकडे गेल्याने त्यांना आणण्यासाठी तो गुराखी गेला असता त्याला तणसाच्या ढिगातून दुर्गंधी आली. त्याने सखोलपणे पाहिले असता मृतदेह दिसला.
त्याने या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील श्रीराम फागू पाथोडे व तंटामुक्त अध्यक्ष यांना दिली. त्यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार केली. या इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीनी ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Crushed stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.