गोंदिया : सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून निघून निसर्ग सान्निध्यात आपला वेळ घालविण्यासाठी नागरिकांची पावले आता जंगलांकडे वळू लागली आहेत. विशेष म्हणजे, व्याघ्र प्रकल्पात वाघोबांचा अधिवास असून त्यांचे हमखास दर्शन होते. हेच कारण आहे की, वर्ष २०२४-२५ मध्ये (मार्च ते एप्रिल) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ३६ हजार ५९२ पर्यटकांनी भेट देत जंगल सफारी केली आहे.
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी, आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याची गरज भासत आहे. यासाठी वनविभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वनपर्यटनाकडे दिसत आहे.
जिल्हावासीयांसाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून, येथे वाघोबाच्या दर्शनासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. जिल्हा व राज्यातीलच नव्हे, तर परराज्य व विदेशातील पर्यटकसुद्धा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येत आहेत. वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ३६ हजार ५९२ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली असून, जंगल सफारी केली आहे.
जून महिन्यात सर्वाधिक पर्यटकांची भेटनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवला जात असून, एवढा काळ सोडला असता नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र, असे असतानाही जून महिन्यात सर्वाधिक आठ हजार ३३४ पर्यटकांनी जंगल सफारी केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पाच हजार ४६ पर्यटकांनी ऑफलाइन बुकिंगद्वारे, तर तीन हजार २८८ पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंगद्वारे व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली असून, जंगल सफारीचा आनंद लुटला आहे.
कॅमेरासाठी मोजावे लागले पाच लाख रुपयेजंगल सफारीसाठी जात असताना कित्येक पर्यटकांना वन व वन्यजीवांचे फोटो काढणे तसेच त्यांचे व्हिडीओ शूटिंग करणे आवडते. यासाठी कित्येक साधा कॅमेरा वापरतात कित्येक जण सिने कॅमेरा वापरत असून जंगल सफारीचे शूटिंग करतात. अशातच साधा कॅमेरा वापरणाऱ्या पर्यटकांकडून चार लाख ८१ हजार ४८४ रुपये, तर सिने कॅमेरा वापरणाऱ्या पर्यटकांकडून ३० हजार ८४९ रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
पर्यटकांची महिनानिहाय आकडेवारीमहिना ऑफलाइन ऑनलाइनएप्रिल १९३६ ८६२मे ४९५० २५०८जून ५०४६ ३२८८ऑक्टोबर ९११ ३६१नोव्हेंबर २६३९ १७७७डिसेंबर २८३४ २०१२जानेवारी १९५५ ८९५फेब्रुवारी १२२३ ५१०मार्च १६९७ ११८९
९४.६० लाख रुपयांचा मिळाला महसूलव्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क आकारला जात असून, याशिवाय वाहन व कॅमेरा शुल्क आकारले जाते. तसेच एका वाहनासाठी एक गाइड सोबत घ्यावा लागतो. अशाप्रकारे वर्षभरात वनविभागाला ९४ लाख ६० हजार ९० रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये ऑफलाइन पर्यटक व त्यांच्या वाहन शुल्कातून ५४ लाख ५४ हजार ६८ रुपये, तर ऑनलाइन पर्यटक व त्यांच्या वाहन शुल्कातून ३४ लाख १६ हजार ४९६ रुपयांचा महसूल मिळाला आहे.