शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 01:30 IST2016-05-19T01:30:26+5:302016-05-19T01:30:26+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावा १९ मे ते ४ जून दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावे
आमगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावा १९ मे ते ४ जून दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राष्ट्रीय बँक सहकारी बँक यांचे प्रतिनिधी, गट सचिव व तलाठी हजर राहणार आहे. कर्जाकरिता लागणारे आवश्यक कागदपत्र वेळेवर उपलब्ध घ्यावे यासाठी तलाठी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी अधिक संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार साहेबराव राठोड यांनी केले आहे.
२० मे रोजी ग्राम पंचायत कालीमाटी येथे सकाळी १० ते ५ दरम्यान भोसा, बोदा, मुंडीपार, टाकरी, टेकरी, बंजारीटोला, मानेकसा, रामजीटोला, कालीमाटी या गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. २३ मे रोजी सरकारटोला येथे ग्रामपंचायत मध्ये नंगपुरा, गोसाईटोला, नंनसरी, मरारटोला, सरकारटोला, २४ मे रोजी ग्राम पंचायत कातुर्ली येथे मोहगाव, करंजी, सितेपार, सुपलीपार, कातुर्ली, २६ मे रोजी ग्रामपंचायत घाटटेमनी येथे गिरोला, बनियाटोला, घाटटेमनी, २७ मे रोजी चिरचाळबांध ग्राम पंचायत कार्यालयात शिवनी, जवरी, खुर्शीपार, बासीपार, बुराडीटोला, शिवनटोला, भजीयापार, खुर्शीपारटोला व चिरचाळबांध, ३० मे रोजी ठाणा ग्राम पंचायत कार्यालयात बोथली, गोरठा, धावडीटोला, मक्कीटोला, ठाणाटोला व ठाणा, ३१ मे रोजी दहेगाव ग्रामपंचायत कार्यालयात मानेगाव, सुरकुडा, धोबीटोला व दहेगाव, १ जून रोजी आमगाव ग्राम पंचायत कार्यालयात माल्ही, बनगाव, महारीटोला, चिचटोला शंभुटोला, सावंगी, पदमपुर, बाम्हणी, पिपरटोला, रिसामा, किडंगीपार, कुंभारटोली व आमगाव, २ जून रोजी बोरकन्हार, पानगाव, कवडी, वळद, रामाटोला, भालीटोला, कटंगटोला, येरमडा, बघेडा, अंजोरा, ३ जून रोजी तिगाव ग्राम पंचायत कार्यालयात पिपरटोला, सोनेखारी, जांभुरटोला, कोपीटोला, कोसमटोला, चिमनटोला, वाघडोंगरी, तर ४ जून रोजी जामखारी ग्रा.पं.कार्यालयात फुक्कीमेटा, आसोली, विर्सी, नांगटोला, पाटीलटोला व जामखारी येथील शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राठोड यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)