नव्या निर्बंधांमुळे लहान व्यावसायिकांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST2021-04-08T04:29:34+5:302021-04-08T04:29:34+5:30
सालेकसा : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्ह्यात ५ एप्रिलपासून ३० ...

नव्या निर्बंधांमुळे लहान व्यावसायिकांवर संकट
सालेकसा : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्ह्यात ५ एप्रिलपासून ३० एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
मिनी लॉकडाऊन शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत असेल, अशी चर्चा सुरु असताना अचानक जीवनावश्यक सेवा सोडून सर्व व्यापारी दुकाने बंद झाल्याने व्यापारी आणि लहान व्यावसायिकांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
एकंदरीत ‘कही ख़ुशी कही गम’ असे चित्र आहे. छोटे व्यापारी शासनाच्या नवीन निर्बंधांवर नाखूश असून, त्यांनी यावर संताप व्यक्त करीत या निर्णयाला विरोध केला आहे. नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली. एकंदरीत या निर्णयाचा सर्वाधिक फटका लघु व्यावसायिक आणि मजूरवर्गाला बसला आहे.