गोंदियातील सहा दुकानदारांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:07+5:302021-04-13T04:28:07+5:30

गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग त्यातच शासनाने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून आपली दुकाने सुरू ...

Crime filed against six shopkeepers in Gondia | गोंदियातील सहा दुकानदारांवर गुन्हा दाखल

गोंदियातील सहा दुकानदारांवर गुन्हा दाखल

गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग त्यातच शासनाने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून आपली दुकाने सुरू ठेवणाऱ्या शहरातील सहा दुकानदारांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यात, शहरातील खंडेलवाल बर्तन दुकानाचे मालक अनिल सीताराम खंडेलवाल (५८, रा.बर्तनलाईन), सीता एजन्सीचे मालक हिरषकुमार टोपनदास आसवानी (५४, रा. सिंधी कॉलनी), चुना दुकानाचे मालक रफीक शेख शौकत अली (४५, रा. सिंधी कॉलनी), राजेश ट्रेडर्स अगरबत्ती दुकानाचे मालक राजेश रामनारायण चौरसिया (५४, रा. रेलटोली) जैन कपडा दुकानाचे मालक सुभाष कन्सेदीलाल जैन (६५, रा. लक्ष्मीवॉर्ड) व लोहा लाईन येथील बलराम कापड दुकानाचे मालक योगेश प्रितदास मुलचंदानी (२१, रा. सिंधी कॉलनी) यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime filed against six shopkeepers in Gondia