गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियमावली तयार केली. या नियमावलीत शनिवार व रविवार हे दोन दिवस दुकाने संपूर्ण बंद राहतील असे गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले होते. परंतु या आदेशाला न जुमानता आपले दुकान सुरू ठेवणाऱ्या २२ दुकानदारांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात ३ दुकानदार ढाकणी येथील आहेत. ३ जुलै रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत गोंदिया शहर पोलिसांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालून दुकानदारांवर गुन्हे दाखल केलेत. पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. गोंदिया शहराच्या मार्केट परिसरातील १७ दुकानदार, सिंगलटोली कुंभारेनगरातील २ दुकानदार, हनुमान चौक ढाकणी गोंदियातील ३ दुकानदारांचा समावेश आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८,२६९.२७० सहकलम ५१(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सहकलम २,३ साथीचे रोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
२२ दुकानदारांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST