अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा
By Admin | Updated: March 13, 2017 00:18 IST2017-03-13T00:18:58+5:302017-03-13T00:18:58+5:30
जिल्हा पोलिसांनी शनिवारी विविध ठिकाणी धाड घालून अवैध दारू विक्रेत्यांकडून दारु जप्त केली.

अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा
गोंदिया : जिल्हा पोलिसांनी शनिवारी विविध ठिकाणी धाड घालून अवैध दारू विक्रेत्यांकडून दारु जप्त केली. ही कारवाई होळीच्या एक दिवसापूर्वी (दि.११) रोजी करण्यात आली.
तिरोडाच्या संत रविदास वार्डातील रुपवंता ईश्वर बरियेकर (३४) या महिलेने मोहफुलापासून दारू गाळण्यासाठी ४ हजार रूपये किंमतीचे ८ पोती मोहफुल साठवून ठेवले होते. ते जप्त करण्यात आले. याच गावातील चंद्रशिला श्रावण कनोजे (५०) या महिलेने ६ हजार रूपये किंमतीचे १२ पोती मोहफुल साठवून ठेवले होते. तेही जप्त करण्यात आले. येडमाकोट येथील विरेंद्र किसन लिल्हारे (३१) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. आंबेडकर चौक कुडवा येथील सुखचंद सुखलाल हट्टेवार (४५) याच्याकडून ६ नग देशी दारुचे पव्वे, गल्लाटोला (पिपरीया) येथील संदीप सुभाष चौरागडे (३०) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे, डुग्गीपार पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सौंदड येथील संतोष राजीराम बनकर (२१) याच्याकडून १८० मिलीचे १९२ देशी दारुचे पव्वे एमएच३५/एसी-५७०९ या मोटर सायकलवर वाहून नेताना पकडण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या दारुची किंमत ९ हजार ६०० रुपये तर मोटरसायकलची किंमत ५० हजार रुपये सांगीतली जाते. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या तुमखेडा येथील महेश गोवर्धन सहारे (३२) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, दवनीवाडा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या बलमाटोला येथील मच्ंिछद्र सुखचंद डोंगरे (४९) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, पिंडकेपार येथील गणेश शालीकराम लाळे (३४) याच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारु, बंडू चौक संजय नगर येथील नसीर गफूर शेख (३३) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, गंगाझरी पोलिसांनी कोहका येथील ओमप्रकाश लिखचंद लमाहे (३६) याच्याकडून २ लिटर हातभट्टीची दारु, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तेढा येथील संतोष दशरथ वाघमारे (४७) याच्याकडून ८ नग देशी दारुचे पव्वे तर धनलाल भैय्यालाल शेंडे (५६) याच्याकडून ८ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. सालेकसा पोलिसांनी शिकारीटोला येथील झनकलाल अनंतराम टेकाम (४५) याच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारु, अर्जुनी-मोरगाव येथील अजया रामय्या मलेवार (५४) याच्याकडून १० नग देशी दारुचे पव्वे, गोंदिया शहर ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुंभारेनगरातील मोहन महादेव ढेंगे (४९) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, पिंडकेपार येथील बाळकृष्ण रामा मरकाम (४९) याच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. सदर घटनेसंदर्भात आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)