रोहयो मजुरीसाठी भाकपचे आंदोलन
By Admin | Updated: May 24, 2014 23:44 IST2014-05-24T23:44:49+5:302014-05-24T23:44:49+5:30
रोजगार हमी योजनेंतर्गत दासगाव खुर्द, लोहारा, पिपरटोला, मानुटोला, किन्ही, गिरोला, धिवारी, चंगेरा, काटी व इतर ठिकाणी कामे करण्यार्या मजुरांना फेब्रुवारी महिन्यापासून मजुरी न मिळाल्याने

रोहयो मजुरीसाठी भाकपचे आंदोलन
गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत दासगाव खुर्द, लोहारा, पिपरटोला, मानुटोला, किन्ही, गिरोला, धिवारी, चंगेरा, काटी व इतर ठिकाणी कामे करण्यार्या मजुरांना फेब्रुवारी महिन्यापासून मजुरी न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना त्वरित मजुरी देणे, मजुरी वेळेवर न देणार्या अधिकार्यांवर कारवाई करणे तसेच इतर प्रश्नांना घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे २0 मे रोजी तालुक्यातील ग्राम दासगाव येथील बसस्थानक चौकातुन मोर्चा काढण्यात आला व राजस्व निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान नायब तहसिलदार पाटील यांना निवेदन सादर करुन चर्चा करण्यात आली. पक्षाचे तालुका सचिव रामचंद्र पाटील, वासुदेवराव ढोके, करुणा गणविर, तालुका सहसचिव प्रल्हाद उके यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणविर, राज्य कार्यकारणी सदस्य हौसलाल रहांगडाले व मिलिंद गणवीर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नायब तहसीलदार पाटील यांनी दोन मस्टरची मजुरी वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले तसेच रायपूर येथे अवैध वसुली करणार्या अशासकीय व्यक्तीला त्वरित हटविण्यात येईल, ग्राम बलमाटोला येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे, अतवृष्टीग्रस्त शेतकर्यांना बँकांमार्फत भरपाई त्वरित देण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांंंना दिल्याने धरणे आंदोलन समाप्त करण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम मेश्राम, सोहन धामडे, प्रियंका ढोके, तुकाराम परसमोडे, पंधरे, ज्ञानीराम मेश्राम यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)