शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एसआरटी लागवड पद्धत कमी खर्चाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:45 IST

वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. पर्यायाने विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो.

ठळक मुद्दे१४ जिल्ह्यांत लागवड : २ हजार ५०० शेतकºयांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. पर्यायाने विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो. शेतकºयांवर अशी वेळ येवू नये याकरिता शेतकºयांनी अतिशय कमी खर्चाची आणि २० वर्षात एकदाच मशागत करुन लागवड केलेली एसआरटी पद्धत उपयोगात आणली तर शेतकºयांचा मशागतीवरचा खर्च, लागवड खर्च, रासायनिक खताचा खर्च, औषधीचा खर्च, वेळ, श्रम, पैसा आणि पाण्याची बचत होईल अशी माहिती कृषीभूषण चंद्रशेखर गडसावळे यांनी दिली.सडक-अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पत्रकारांसोबत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी आपल्या शेतीवर प्रत्यक्ष प्रयोग करुन झिरो बजेट असणारी शेती करुन नंतर त्याचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टÑात १४ जिल्ह्यात २ हजार ५०० शेतकरी झिरो बजेट शेती करीत आहेत. वाल, चना, लाखोरी, चवळी, धान, मका, ज्वारी, सोयाबिन, कोबी, कापूस अशासारखी पिके घेतली जातात. जर लागवड खर्चच कमी असेल तर शेतकरी कर्जबाजारी होवू शकत नाही असेही गटसावळे यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगीतले. एसआरटी पद्धत नेमकी काय आहे यावर बोलताना ते म्हणाले जमिनीवर होणारे नागरिकांचे अत्याचार न होता जमिनीची धूप थांबविणे, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देणे, त्यामुळे जमिनीत सेंद्रीय कर्ज साठविले त्यामुळे उत्पादनात निश्चित वाढ होवून शेतकºयांना आनंदी करणारी पीक रचना म्हणजे एसआरटी होय. हे तंत्रज्ञान गोंदिया जिल्ह्यातील शेतकºयांनी उपयोगात आणल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशिवार, संचालक देवचंद तरोणे, दिलीप गभणे, हिरालाल चव्हाण, वसंत गहाणे, डॉ. ऋषीराम वाढई. गंगाधर सोनवने, रतिराम कांबळे, रोशन बडोले, सुखदेव कोरे, मिलन राऊत उपस्थित होते.