कोसबी बंधारा वरदान

By Admin | Updated: May 20, 2015 01:30 IST2015-05-20T01:30:52+5:302015-05-20T01:30:52+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कोसबी बंधारा वरदान ठरत आहे. खा.प्रफुल्ल पटेलांनी पाच वर्षापूर्वी एक कोटींचा कोहमारा कोसबी बंधारा मंजूर केला.

Cosby Bond Bondage | कोसबी बंधारा वरदान

कोसबी बंधारा वरदान

सिंचनाची वाट मोकळी : ३०० हेक्टर शेती येणार सिंचनाखाली
सडक-अर्जुनी : तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कोसबी बंधारा वरदान ठरत आहे. खा.प्रफुल्ल पटेलांनी पाच वर्षापूर्वी एक कोटींचा कोहमारा कोसबी बंधारा मंजूर केला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील ३०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून हा बंधारा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावणारा बंधारा ठरणार आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी खा.पटेलांनी पाच वर्षापूर्वी एक कोटी रुपयांचा कोल्हापूर बंधारा मंजूर करुन कोहमारा कोसबी बंधारा शशीकरण नाल्यावर बांधला. या बंधाऱ्यामुळे कोसबी, चिखली आणि राका या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. सदर बंधाऱ्याचे काम जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पाहात आहेत. सदर बंधाऱ्याचे काम लघु पाटबंधारे जलसंधारणामार्फत होणार आहे. या बंधाऱ्यासाठी तत्कालीन जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी विशेष निधी दिला होता.
सडक-अर्जुनी तालुक्यातील हा परिसर डोंगराळ असल्यामुळे येथून नाले वाहत नाही. येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून सदर बंधारा मंजूर करवून घेतला होता. येत्या काही दिवसातच त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष जीवन लंजे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी मिळालेल्या या सोयीसुविधेमुळे जिल्हाध्यक्ष लंजे यांच्यासह युवराज वालदे, सुभाष कापगते, डॉ. बी.डी. कोरे, शिवाजी राणे, भागवत कापगते यांनी खा.पटेलांचे आभार मानले. (शहर प्रतिनिधी)
पाण्याची समस्या सुटेल
या बंधाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल तसेच चाऱ्याचीही व्यवस्था या बंधाऱ्यामुळे होईल. सिंचन वाढण्याबरोबरच जनावरांचाही प्रश्न सुटेल. उन्हाळ्यात दरवर्षी या परिसरात पिण्याच्या पाण्याची टांचाई भासत होती. ती टंचाई दूर होण्यासाठी हा बंधारा महत्वाचा ठरणार आहे. असे मोठे बंधारे प्रत्येक तालुक्यात तयार केल्यास शेतकऱ्यांची समस्या सुटेल.

Web Title: Cosby Bond Bondage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.