मुरमाडी येथील नाल्या स्वच्छतेच्या कामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:33+5:302021-02-24T04:31:33+5:30

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरमाडी येथे ग्रामपंचायतअंतर्गत करण्यात आलेल्या नाली साफसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तुषार पटले यांनी केला ...

Corruption in nalla cleaning work at Murmadi | मुरमाडी येथील नाल्या स्वच्छतेच्या कामात भ्रष्टाचार

मुरमाडी येथील नाल्या स्वच्छतेच्या कामात भ्रष्टाचार

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरमाडी येथे ग्रामपंचायतअंतर्गत करण्यात आलेल्या नाली साफसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तुषार पटले यांनी केला आहे. तसेच या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीतून केली आहे.

मुरमाडी येथील नाली सफाईच्या कामात झालेल्या घोळाची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे १३ जानेवारी २०२१ ला तुषार पटले व काही गावकऱ्यांनी केली होती. परंतु त्यांनी या कामाची चौकशी करून कारवाई केली नाही. नाली सफाईच्या कामावर गावात राहत नसलेल्या मजुरांची नावे दाखवून मजुरी काढण्यात आल्याचा आरोप केला. तसेच दुबई येथे वास्तव्यास असलेल्या गावातील व्यक्तीला नाली सफाई कामाच्या हजेरीपत्रकावर दाखवून मजुरीची उचल करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तुषार पटले, जितेंद्र तिजारे, मयूर महालगावे, संजय शेंडे यांनी केली आहे.

Web Title: Corruption in nalla cleaning work at Murmadi