क्रीडा स्पर्धा आयोजनावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:07+5:302021-03-27T04:30:07+5:30
केशोरी : दरवर्षी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेकरिता प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण प्रदान करून ...

क्रीडा स्पर्धा आयोजनावर कोरोनाचे सावट
केशोरी : दरवर्षी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेकरिता प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण प्रदान करून श्रेणी दिली जाते. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या महामारीने शाळा बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी हिवाळी, पावसाळी क्रीडा स्पर्धा आयोजनावर बंदी घालावी लागली. परिणामी दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा देणारे क्रीडा खेळाडू या क्रीडा सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्याप्रमाणे राज्य परीक्षा मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षा शाळा स्तरावर आयोजित करून असेंसमेंट देण्यासंबंधात सूचना शाळा प्रमुखांना जारी केल्या त्याचप्रमाणे क्रीडा सवलती देण्यासंबंधी शाळास्तरावर एखादा प्रोजेक्ट राबविण्याचे निर्देश देऊन क्रीडा खेळाडूंना सवलतीचे गुण बहाल करून श्रेणी देण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी केली आहे. शैक्षणिक सन २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे तालुका स्तरासह राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाही. त्यामुळे कोणत्याही क्रीडा स्पर्धकांना भाग घेता आला नाही. परिणामी दरवर्षी राज्य परीक्षा मंडळाकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी क्रीडा सवलतीच्या गुणापासून श्रेणीपासून क्रीडा खेळाडू वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परीक्षा आयोजनासंबंधी राज्य परीक्षा मंडळांनी विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा शाळा स्तरावर आयोजनाच्या सूचना दिल्या आहेत. त्याच पद्धतीनुसार शाळास्तरावर क्रीडा स्पर्धा असेसमेंट तयार करण्याचे शाळा प्रशासनाला निर्देश देऊन क्रीडा सवलतीची श्रेणी बहाल करावी अशी शासनाला विनंती करून मागणीचे निवेदन शिक्षक भारती संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी सादर केले आहे. त्यामध्ये क्रीडा स्पर्धेत दरवर्षी भाग घेणारे विद्यार्थी नाराज होणार नाही किंवा त्यांच्या मनावर परिणाम होणार नाही, क्रीडा स्पर्धासंबंधी नैराश्य निर्माण होणार नाही याची शासनाने काळजी घेऊन क्रीडा सवलत श्रेणी देण्याची मागणी प्रा. नाकाडे यांनी केली आहे.