कोरोनाने पकडली जिल्ह्यातून परतीची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:16+5:302021-02-14T04:27:16+5:30
काही जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र गोंदियावासीय घेत असलेल्या काळजीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याचे चित्र आहे. ...

कोरोनाने पकडली जिल्ह्यातून परतीची वाट
काही जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र गोंदियावासीय घेत असलेल्या काळजीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोना बाधितांचा आलेख पूर्णपणे खाली आला आहे. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसात जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनिवारी जिल्ह्यात १ बााधिताची नोंद झाली तर ४ जणांनी मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ६७७२१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५६०५० नमुने निगेटिव्ह आले आहे. कोराेना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातर्गंत आतापर्यंत ६६८९७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६०७५३ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १४२८२ कोरोना बाधित आढळले. त्यापैकी १४०२५ जणांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत ७४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
......