जनसेवा संस्थेच्या वतीने कोरोना योद्धाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST2021-02-13T04:27:58+5:302021-02-13T04:27:58+5:30

सौंदड येथील माँ आदिशक्ती आलेश्वरी दुर्गा मंदिराच्या परिसरात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले, जनसेवा परिवर्तन ...

Corona warrior felicitated on behalf of the public service organization | जनसेवा संस्थेच्या वतीने कोरोना योद्धाचा सत्कार

जनसेवा संस्थेच्या वतीने कोरोना योद्धाचा सत्कार

सौंदड येथील माँ आदिशक्ती आलेश्वरी दुर्गा मंदिराच्या परिसरात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले, जनसेवा परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष संदीप मोदी, जनसेवा बहु.विकास संस्थेचे अध्यक्ष हर्षकुमार मोदी, जनसेवा महिला अध्यक्ष रंजना भोई, भाजपा तालुका कोषाध्यक्ष शामसुंदर अग्रवाल, विनोदकुमार मोदी, भाजप जिल्हा सचिव शेषराव गिऱ्हेपुंजे, माजी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, माजी उपसभापती कविता रंगारी, जयप्रकाश मोदी, कपिल अग्रवाल, शंकर खेकरे, डॉ.गहाणे, चरण शहारे, मदन साखरे, ओमकार ईरले, शोभा चोपकर, वर्षा शहारे, वर्षा भांडारकर, माजी जि.प.सदस्य रूपाली टेंभुर्णे, अंजली मुनिश्वर, सरपंच रंजना गोबाडे, सुभाष सावरकर, सावल इरले उपस्थित होते. याप्रसंगी सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ग्रा.पं.कर्मचारी, अंगणवाडीसेविका, सामाजिक कार्यकर्ता यांच्यासह पत्रकार बिरला गणवीर, बबलू मारवाडे, सुशील लाडे, राजेश मुनिश्वर, अनिल मुनिश्वर, शाहिद पटेल, अशोक इळपाचे यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गौरेश बावणकर यांनी केले.

Web Title: Corona warrior felicitated on behalf of the public service organization